तीन तास मुसळधार पावसात महामार्गावर पाण्याच्या खड्ड्यात बसून स्नेहलता कोल्हे यांचे  “खड्डे बुजवा जीव वाचवा” आंदोलन

तीन तास मुसळधार पावसात महामार्गावर पाण्याच्या खड्ड्यात बसून स्नेहलता कोल्हे यांचे  “खड्डे बुजवा जीव वाचवा” आंदोलन

Snehalata Kolhe’s “Khadde Bujwa Jeev Bachwa” protest by sitting in a water pit on the highway in heavy rain for three hours.

आंदोलनाची तीव्रता अधिकाऱ्याने पाण्यात बसूनच स्वीकारले निवेदन The intensity of the agitation was accepted by the officer while sitting in the water

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 13 Oct , 20.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची  वर्दळ असणा-या या महामार्गावर  “खड्डे बुजवा, जीव वाचवा” अशी जोरदार भूमिका घेत सातत्याने कोसळणार्‍या मुसळधार   पावसात  रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या गुडघाभर पाण्यात  दोन ते अडीच तास बसून भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह गुरुवारी(१३) रोजी  दुपारी मूकबधिर विद्यालयासमोर महामार्गावर  जोरदार आंदोलन केले.

नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे कोपरगाव या रस्त्याला गुडघाभर खड्डे पडले आहे त्याबाबत भाजपाच्या प्रदेशाची स्नेहलता कोल्हे यांनी गुरुवारी भर पावसात तीन तास ठिय्या आंदोलन करून खड्डे बुजवा जीव वाचवा निवेदन राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिकचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे यांना यावेळी निवेदन देण्यात आले, संगमनेर कार्यालयाचे उपविभागीय अभियंता एस.टी. बडगुजर यांनी गुडघाभर पाणी असलेल्या खड्ड्यात बसूनच त्याचा स्वीकार केला. 
सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,नगर  मनमाड  रस्त्याची चाळण झाली असून या  रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे केवळ वाहतूककोंडीचीच समस्या नव्हे, तर अपघातांनाही आयते आमंत्रण मिळून कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. साईबाबांची शिर्डी याच रस्त्यावर असून देश-विदेशातील भाविक या मार्गाने दर्शनासाठी येत असतात, कोपरगाव शिर्डी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना भाडे मिळूनही रुपया शिल्लक राहत नसेल इतकी वाईट अवस्था असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली  तर सामान्य माणूस  शारीरिक मानसिक, आर्थिक, थकला आहे सणासुदीला लेकीबाळींना  ने-आण कशी करायची या विवंचनेत सापडला आहे. तर गरोदर महिलांना दवाखान्यात नेतांना जीवमुठीतच घेऊन प्रवास करावा लागतो इतकी भयानक स्थिती झाली आहे जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी सर्वांनाच नित्यनेमाने प्रवास करावा लागत आहे,  कामाची लगबग वाढली आहे, रात्री अप रात्री प्रवास करताना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही, साखर कारखान्यांचे गळीत हंगाम तोंडावर आले आहेत,अनेकांचे हात, पाय, कंबर, मणके मोडले असून कायमचे जायबंदी होण्याचे प्रमाण वाढले आहे. 
आत्ताचे आदेश केवळ सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्यासाठी  आहेत 
गेले दोन दिवसापासून मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या स्वीयसायकांच्या संपर्कात होते त्यांनी आदेश दिले पण अधिकारी म्हणतात आम्हाला दिलेले आदेश सावळीविहीर ते कोपरगाव  यापर्यंतच्या  रस्त्याचे आहेत माझ्याही सूचना त्याचप्रमाणे होत्या कारण मीही कोपरगावकरांना होत असलेल्या त्रासाबद्दलच बोलले होते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाचे निवीदा नुकत्याच काढलेल्या आहेत असेही त्या म्हणाल्या 
  
 वारंवार तक्रारी करून माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम खात्याची कानावर हात, तोंडावर बोट अशीच भूमिका होती. तसदी  झाली तरी चालेल पण आंदोलन झालेच पाहिजे तरच लोक जागे होतील पावसाने किंवा पाण्याने माणसं मरत नाहीत तर खड्डे पडल्यामुळे होणाऱ्या अपघातामुळे लोक मरतात शेवटी आज केलेल्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन मात्र आता जे आदेश आले ते केवळ सावळीविहीर ते कोपरगाव हेच आदेश आलेले आहेत हे ही सत्य समोर आले आहे 
 पावसाचे पाणी भरलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात मांडी घालून आंदोलकाच्या बरोबरीने बसण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यावर आली आता तरी त्यांनी गांभीर्याने या गोष्टीची दखल घ्यावी पाऊस झाले की रस्त्याचे काँक्रिटीकरण करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, त्यावर स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, रस्त्याचे  काँक्रिटीकरण कराल तेव्हा करालं तेंव्हा करा, आधी तातडीने रस्त्याचे खड्डे बुजवा,  पावसाचे कारण सांगू नका आणि पाऊस थांबण्याची वाटही पाहू नका,  सेक्शन पंप आणा पाणी उपसा, रस्ते दाबून द्या, निकृष्ट काम चालणार नाही दिवाळीच्या आत हे काम झाले पाहिजे अशा सक्त सूचना त्यांनी  निवेदन देताना अधिकाऱ्यांना केल्या

Leave a Reply

You cannot copy content of this page