हर्षदा बानकर खून प्रकरण :  प्रेयसी पत्नीला प्रियकर पतीची खूनासाठी मदत  ; दोन दिवस पोलीस कोठडी

हर्षदा बानकर खून प्रकरण :  प्रेयसी पत्नीला प्रियकर पतीची खूनासाठी मदत  ; दोन दिवस पोलीस कोठडी

Harshada Banker murder case: Lover’s husband helps lover’s wife in murder; Police custody for two days

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 13 Oct , 20.10 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  शहरापासून जवळच असलेल्या भन्साळी ट्रॅक्टर जवळ तीन चारी कोकमठाण येथे राहत्या घरात पाठच्या बहिणीचा  गळा आवळून खून केल्यानंतर तरुणीने राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावून   आत्महत्याचा बनाव करणाऱ्या  प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सृष्टी  बानकर व आकाश राजेंद्र कांगुणे या लग्न केलेल्या प्रेमी युगुलाला खंडाळा श्रीरामपूर येथून अटक केली होती.

मुख्य आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपासांती या खून प्रकरणात मुख्य आरोपीचा पती आकाश कांगणे याचाही हात असल्याचे समोर आल्याने त्याला न्यायालय हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज दोन्ही आरोपी मॅजेस्टिक कोठडीमध्ये आहेत.
अशी घडली घटना
ही घटना ३० सप्टेंबरला कोकमठाण मध्ये  घडली होती. प्रियकरांन दिलेला मोबाईल बहिणीने  आई-वडिलांना दिला आई-वडिलांनी तिचे कॉलेज जाणे बंद केले. प्रिय करा बरोबर पळून जात असताना  लहान   बहिणीने परत विरोध केला . त्यामुळे रागाच्या भरात तिचा कापडी ओढणीने गळा  आवळून  जिवे ठार मारले व  तिच्या आत्महत्येचा बनाव केला. तिने आत्महत्या   केली नसून मी व तिचा त्यांचा खून केल्याची कबुली सृष्टीने दिली होती . या खून प्रकरणात तिचा प्रियकर तिला  प्रियकर पती याने   तिला मदत केली होती की काय याचा पोलीस तपास करत होते
 दरम्यानच्या काळात शहर पोलिसांनी मुख्य आरोपी सृष्टी बानकर तिच्याकडे  चौकशी केली असून खून प्रकरणात प्रियकर पतीने  मदत केली, याविषयी काही माहिती मिळाल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.  प्रकरणात  आकाश राजेंद्र कांगुणे (२१) रा खंडाळा ता श्रीरामपुर याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी पत्नीस खून करण्यास मदत करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याला  अटक करून ताब्यात घेतले. आता या गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या २ झाली आहे. न्यायालयाने सदर आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या खूनाचा तपास  शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे करीत आहेत. 
 
दहा दिवसांपूर्वी सोळा वर्षाच्या सख्ख्या बहिणीचा  खून झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता  या गुन्ह्याच्या बारकाईने तपास करता पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तिच्या मोठ्या बहिणीने तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते अधिक तपास करता या कामी तिला तिच्या नवऱ्याने सहकार्य केल्याचे निष्पन्न झाल्याने  त्यालाही अटक करण्यात आली  दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात  आली होती आज  दोन्ही आरोपी  मॅजेस्टिक कस्टडी मध्ये आहे – उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संजय सातव

Leave a Reply

You cannot copy content of this page