ज्यांची निष्ठा सेनेवर नाही त्यांना आ. काळेंच्या सहानुभूतीवर बोलण्याचा अधिकार नाही : सय्यद

ज्यांची निष्ठा सेनेवर नाही त्यांना आ. काळेंच्या सहानुभूतीवर बोलण्याचा अधिकार नाही : सय्यद

Come to those who do not have loyalty to the Sena. No right to speak on kale sympathy: Saiyed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 17 Oct , 19.30 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : त्या सच्चा शिवसैनिकांबाबत आमदार आशुतोष काळे यांनी अंतकरणापासून दाखविलेली सहानुभूतीवर ज्यांची निष्ठा सेनेवर नाही, त्यांना तर बोलण्याचा अधिकार अजिबात नाही. अशी टीका माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, शिवसेना पक्ष अडचणीत आहे. शिवसेना प्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेच्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेसह अनेक राजकीय पक्षांना देखील शिवसेनेबाबत अमाप सहानुभूती निर्माण झाली आहे. मात्र जे शिवसेना आणि मातोश्रीशी प्रामाणिक नाहीत त्यांना यात राजकारण दिसत आहे ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांना खरी  शिवसेना आजपर्यंत कधी समजलीच नाही व यापुढे देखील समजणार नाही. असे यांनी म्हटले आहे

ज्या भाजपने शिवसेनेला संपविण्यासाठी षडयंत्र रचले. शिवसेनेत उभी फूट पाडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास दिला. राज्यात ज्या पक्षाने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला पायदळी तुडविले. त्या भाजपच्या वळचटीला जावून बसणांऱ्याना खरी शिवसेना समजली नाही कारण तुम्हाला एकनिष्ठ काय असते हे माहीत नाही. तुमची निष्ठा शिवसेनेवर नसून पाकिटावर आहे. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी ज्या एकनिष्ठ शिवसैनिकांबाबत अभिमान असल्याचे वक्तव्य केले ते निष्ठावान तुम्ही नाहीत.तुमची निष्ठा मिळणाऱ्या पाकिटावर आहे. असा टोमणा सय्यद यांनी मारला.

ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार पडले त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यावेळी ज्या भाजपने कोपरगाव शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी जातीने हजर राहून आनंद व्यक्त करीत होता.यावरून तुमची निष्ठा कुठे हे समजून आले. तुमच्या सारख्या फितुरांना अधिकार नाही अशा स्पष्ट आणि मोजक्याच शब्दात सय्यद यांनी कोल्हे सैनिकांवर टीका केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page