स्वार्थासाठी सेना सोडणा-यांना टीका करण्याचा नैतिक अधिकारच नाही -सागर जाधव
Sagar Jadhav has no moral right to criticize those who quit the Sena for selfish reasons
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 17 Oct , 19.40 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवसेना सोडून काळेंच्या कळपात सामील झालेल्यांना शिवसैनिकांबद्दल बोलण्याचा किंवा टिका करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. तशी त्यांची लायकी नाहीच. अशा शब्दात कैलास जाधव यांच्यावर टिका करणा-या माजी अपक्ष नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्या वक्तव्यावर प्रसिद्धी पत्रकातून सागर जाधव यांनी पलटवार केला आहे .
सेनेने आमदार केल्यानंतर सुद्धा काळेंनी सेना सोडली होती. परत आले आमदार झाले पुन्हा शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तुम्हालाही सेनेने अनेक पदे दिली वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संधी दिली होती; कोल्हे यांनी युती धर्म पाळून तुम्हाला स्वीकृत नगरसेवक केले परंतु तरीही शिवसेनेला धोका देऊन तुम्ही काळे गटात सामील झाले. ही गद्दारी नाही का? त्यांना आज शिवसैनिकांचा अभिमान वाटतो आणि त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर निशाणा साधता ही लाचारी नाही का ? हे सत्य कोल्हे परिवार आणि शिवसैनिक यांच्याबद्दल कितीही गरळ ओकली तरी लपणार नाही, काळेनी तुमचे पाकिटाचे ‘वेलकम कशा प्रकारे ’ केले त्यामुळे ते सांगतील तसेच बोलावे आणि ऐकावे लागते हे सर्वश्रुत आहे. ज्यांना स्वत:ला मराठी नीट बोलता येत नाही आणि लिहिताही येत नाही अशा अंगठाबहद्दर लोकांनी इतरांच्या बातम्या कुठून येतात यावर बोलणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद असल्याचा टोमणा जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून मारला आहे.
आपल्या वार्डात काम करणाऱ्या ठेकेदारांना आपण का त्रास देत होता हे लपून राहिलेले नाही. अनेक पक्ष बदलणाऱ्यांनी शिवसैनिकांना निष्ठा शिकविण्याचे धाडस करू नये, असा खोचक सल्ला सागर जाधव यांनी सय्यद यांना दिला आहे.