रानटी डुकराच्या हल्ल्यात माजी सरपंच जखमी
Former sarpanch injured in wild boar attack
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 8.10 am
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील मुर्शतपुर म्हसोबा नगर परिसरात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी फिरत असताना त्यांच्या ऊसाच्या शेतातील डुकरांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात माजी सरपंच जखमी झाले . त्यांच्यावर नेरूळ नवी मुंबई येथे उपचार चालू सुरू आहेत. या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे. दिलीपराव भानुदास शिंदे (५२) असे जखमी असलेल्या माजी सरपंच यांचे नाव आहे .
आपल्या ऊसाच्या शेतात डुकरांचा कळप उसाची नुकसान करत असल्याचे त्यांना जाणवले ते तात्काळ उसात घुसलेले डुकरे हाकलण्यासाठी पुढे सरसावले मात्र या रानडुकरांची संख्या एकापेक्षा जास्त दहा पंधरा असल्याने त्यांनी उलट शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात शिंदे पडले गेले. मग छाती व इतर शारीरिक भागावर या डुकराने जोरदार धडक मारली. त्यात शिंदे जखमी झाले आरडाओरड करत शेजारी असलेल्या वस्तीवरील नागरिक धावले आणि त्यांची या डुकरांपासून सुटका केली. शिंदे जखमी झाल्याचे लक्षात येतात कोल्हे कारखान्याचे संचालक आप्पासाहेब दवंगे, काळे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, रामदास शिंदे, साहेबराव शिंदे, विष्णु शिंदे, सुधाकर शिंदे, सुनील दवंगे, काका शिंदे, माणिक शिंदे, जालू शिंदे ,गोरख शिंदे ,कैलास शिंदे , शांतीलाल शिंदे ,मिलिंद शिंदे आदींनी घटनेची माहिती मिळताच शिंदे यांना कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे एका हाताला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना नवी मुंबई नेरूळ येथे काल सोमवारी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहे.
या डुकरांची वाढती दहशत लक्षात घेता जखमी झालेले दिलीप शिंदे, रामदास शिंदे,डॉ अनिल दवंगे यांनी या डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे वेळोवेळी केली होती. आता वनविभाग याकडे लक्ष देऊन या डुकरांचा बंदोबस्त करेल का असा प्रश्न मुर्शतपुर परिसरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे…
Post Views:
237