कोपरगावसह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; अवघ्या चार तासात  ७२ मिमी पाऊस 

कोपरगावसह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस ; अवघ्या चार तासात  ७२ मिमी पाऊस 

Thunderstorm-like rain in Kopargaon and Taluka; 72 mm of rain in just four hours

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 20 Oct , 18.00 pm
By राजेंद्र सालकर
हजारो क्विंटल कांदा पाण्यात वाहून चालला आहे

कोपरगाव : कोपरगाव शहरासह तालुक्याला परतीच्या पावसाने गुरूवारी (ता. १९) रात्री  पुन्हा एकदा दणका दिला. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने उरल्यासुरल्या खरीप व भाजीपाला पिकांची वाट लागली आहे. कोपरगाव शहरात ढगफुटीमुळे अवघ्या  तीन चार तासांत ७२ मिलिमीटर पाऊस पडला. शहरातून वाहणारी गोदावरीनदी पुन्हाधोक्याच्या पातळीत आल्याने शहरवासीयांच्या मनात धस्स झाले होते. खंदक नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागले  तालुक्याच्या विविध भागात नाले, ओहोळ देखील पातळी सोडून वाहत होते.

पोहेगाव येथील आरोग्य केंद्र पाण्यात
गुरुवारी (ता. १९) मध्यरात्रीपासूनच  कोपरगाव तालुक्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. महसूल विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार  शहरात चार तासात विक्रमी ७२  मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
कांदा व्यापाऱ्यांना दिलासा देताना बिपिनदादा कोल्हे
कोपरगाव शहरात ७२  मिलिमीटर दहेगाव बोलका ५४ मिलिमीटर पोहेगाव ४२ मिलिमीटर सुरेगाव ८७ मिलिमीटर रवंदे ५५ मिलिमीटर, तर चांदेकसारे आनंदवाडी दयानंदवाडी येथे ५५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. अर्थात ही आकडेवारी मंडळ स्तरावरील गावांमध्ये बसवलेल्या पर्जन्यमापक यंत्रांची असून, जागोजागी पडलेला पाऊस ढगफुटीसदृश असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात होऊन अवघ्या काही मिनिटांत परिसर जलमय बनल्याचे चित्र सर्वच भागात बघायला मिळाले.  चांदेकसारे शिवारात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार केल्याने, आनंदवाडी दयानंदवाडी पुर्ण पाण्याखाली गेल्याने २५० कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून पूर्ण परिसर पाण्यात बुडाला आहे. नागरिकांनी घरावर बसून काढली रात्र काढली. सोनेवाडी नागरवाडी येथील अतिवृष्टीमुळे  या भागात नाले, ओहोळ देखील पातळी सोडून वाहत होते.
आमदार आशुतोष काळे तहसीलदार विजय बोरुडे यांना व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना पंचनामा संदर्भात सूचना करताना
कोपरगाव शहरात देखील ७२  मिलिमीटर पावसाने  धावपळ उडवली. विशेषतः पावसाची झळ बसलेल्या  खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, समतानगर, शारदानगर, संजयनगर, खंदक नाला  शिक्षक कॉलनी. द्वारकानगरी, संजयनगर, ब्रिजलालनगर आदी भागात अनेक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघ्याइतके पाणी साचल्याने घरातील अन्नधान्य, कपडे व इतर जीवनावश्यक साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. या भागात राहणाऱ्या रहिवाशांना रात्र जागून काढावी लागली. 
पावसाचा जोर एवढा भयानक होता.
शिंगणापूर येथील डाम-या नाल्याला आलेला पूरामुळे भगवान लोणारी यांच्या घराला व पोल्टीफार्मला पाण्याचा वेढा पडला , पोहेगांवच्या नदीला पूर आल्यामुळे काही तास कोपरगाव संगमनेर रोडची वाहतूक बंद ठेवावी लागली.पोहेगाव परिसर जलयुक्त झाला होता. खडकी नाला जांभूळ नाला अदी नाल्यांना महापूर आला होता.पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या इमारतीसमोर असलेल्या कात नाल्याला पूर आल्या कारणाने पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर संपूर्ण जलमय झाला. पोहेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा फूट पाणी.येसगाव कांदा चाळी पाण्यात पाणी शेकडो टन कांदा पाण्यात वाहून गेला. अंदाजे पाच ते सहा कोटी चे कांदा नुकसान झालेले आहे कारण या ठिकाणी असलेल्या कांदा सुपर कांदा होता जो २४०० ते २५०० रुपये दराने खरेदी केलेला होता. शेतक-यांकडुन खरेदी केलेला कांदा मातीमोल झाला. अति पाण्यामुळे साठवणुक केलेला कांदा सडला आहे. शेतक-यांना कांद्याचे पैसे कसे द्यायचे अशी चिंता आता या व्यापा-यांना सतावु लागली आहे तर काहींनी स्वतःचे पैसे उपलब्ध करून शेतक-यांना पटटी दिली मात्र त्यांचा कांदा वाहुन गेल्यांने तोटा झाला आहे. ऐन दिवाळीत या संकटामुळे व्यापा-यांचे तोंडचे पाणी पळाले आहे 
खडकी परिसरात अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, विजय आढाव भाजपचे कार्यकर्ते संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सेवक आपातग्रस्त नागरिकांना मदत करताना
बहादराबाद येथे २  घरात पाणी शिरले, डाऊच खुर्द येथे अंदाजे ५० घरात पाणी जाऊन नुकसान झालेले आहे. कोकमठाण येथे काल रात्री झालेल्या पावसात वीज पडून दीपक रक्ताटे यांची  कालवड मृत्युमुखी पडली.. मौजे धोत्रेतील गावठाण लगत १० घरात पाणी, डाऊच खुर्द येथे अंदाजे ५० घरात पाणी शिरले, करंजीबुद्रुक येथे दोन घरात पाणी शिरले माहेगाव देशमुख येथे  १० ते १५ घरात पाणी शिरले. खडकी नाला व शिंदे वस्ती जवळ असलेल्या पुलावर पाणी असल्याने पोहेगाव पाथरे रोडची व पोहेगाव देर्डे को-हाळे रोडची पूर्ण वाहतूक बंद झाली होती.
दरम्यान संजीवनी उद्योग समूह अध्यक्ष  बिपिनदादा कोल्हे माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या वतीने  शहरातील खडकी भागात नागरिकांचे स्थलांतर घरातील पाणी काढणे दुकानातील पाणी काढणे व त्यांच्या जेवणाची सोय करणे या  सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या  आहेत
आमदार आशुतोष काळे अतिवृष्टी भागाची पाहणी करून तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
 
माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांनी  शहरासह तालुक्यातील  ठीक-ठिकाणच्या भागात फिरून अतिवृष्टीचे पाहणी केली आहे संजीवनी आपत्कालीन व्यवस्थापनाकडून ठिकठिकाणी मदत पोहोचविली  आपत्तीग्रस्त नागरिकांना जेवणाची व्यवस्था करून दिलासा दिला
  

Leave a Reply

You cannot copy content of this page