कोपरगाव शहरात पोलिसांचे पथ संचलन
Police road traffic in Kopargaon city
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 19 Oct , 19.00 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : दिपावलीच्या पार्श्वभूमीवर रॅपिड ऍक्शन फोर्स (जलद कृती दल) १०२ मुंबई बटालियन व पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानाने मा. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने आज बुधवारी (१९)रोजी सकाळी कोपरगाव शहरातून पथ संचलन करण्यात आले.
दीपावली उत्सवाचा आता रंग भरू लागले असून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे. बुधवारी शहरातील सावरकर चौक, गांधीनगर टिळक नगर धारणगाव रोड आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आदींसह संपूर्ण परिसरात पाेलिस अधीक्षक मनोज पाटील उपविभागीय अधिकारी संजय सातव, वरिष्ठ निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संचलन करण्यात आले.
जलद कृती दलाचे मिना साहेब, सिंग साहेब यासह ५५ अधिकारी व कर्मचारी १५ कर्मचारी, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून नेमण्यात आलेले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सपोनी भरत दाते, सपोनी रोहिदास ठोंबरे, सपोनी संजय पवार या सह पोलीस दलाचे १५ कर्मचारी होमगार्ड, आदींसह सर्व पथकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांनी पोलिसांच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Post Views:
329





