संजीवनी उद्योग समूहाकडून भोजन व्यवस्थेसह मदतीचा हात; आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा  

संजीवनी उद्योग समूहाकडून भोजन व्यवस्थेसह मदतीचा हात; आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा 

A helping hand with food arrangements from Sanjeevani Udyog Group; Relief to disaster affected citizens

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 20 Oct , 18.20 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : गुरुवारी मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कोपरगाव शहरातील अनेक भागात दाणादाण उडाली अशा आपत्तीग्रस्त परिस्थितीत संजीवनी  आपत्ती व्यवस्थापन भाजप कार्यकर्ते नगरसेवक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सेवक या सर्वांनी भोजन व्यवस्थेसह मदतीचा हात दिल्याने  आपत्तीग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला. केवळ सहानभूती नव्हे थेट कृती या संजीवनीच्या मदत कार्याला नागरिकांचा सलाम

अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, विजय आढाव भाजपचे कार्यकर्ते संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सेवक आपातग्रस्त नागरिकांना मदत करताना
             संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  कारखान्याचे अध्यक्ष,  विवेक कोल्हे यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर रात्रभर मदत कार्य करण्यात आले 
          (१९ ऑक्टोबर) मध्यरात्री सर्व नागरिक गाढ झोपेत असतानाच अचानक कानठळ्या बसविणाऱ्या विजांचा कडकडाट अन ढगांचागडगडाटासह   मध्यरात्री एक ते पहाटे साडेचार-पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, अनेक नागरी वस्त्यांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे प्रचंड नुकसान पाहून या अस्मानी संकटाची भयावहता आज सकाळी समोर आली. तालुक्यातील अनेक गावानाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पूर्णत: वाया गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीचा सण तोंडावर आला असताना कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत.
सलग चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची माहिती मिळताच  युवा नेते विवेक कोल्हे यांनी पावसाची झळ बसलेल्या  खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, समतानगर, शारदानगर, संजयनगर, खंदक नाला  शिक्षक कॉलनी. द्वारकानगरी, संजयनगर, ब्रिजलालनगर आदी भागात अनेक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघ्याइतके पाणी साचल्याने घरातील अन्नधान्य, कपडे व इतर जीवनावश्यक साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. अशावेळी कोल्हे कुटुंब मदतीला धावून आलले.  
           अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माधवराव आढाव पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव, प्रसाद आढाव, माजी नगरसेवक जनार्दन कदम, फकीर महंमद पैलवान, खालिक कुरेशी आदींनी आज सकाळी कोपरगाव शहरातील खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, संजयनगर, निवारा, खंदक नाला आदी भागात जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नागरिकांना मदत करून धीर दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page