समता स्कूल प्रदर्शन; रकमेतून साई अनाथालयाची दिवाळी गोड करणार – स्वाती कोयटे
Samata School Exhibition; Sai Orphanage’s Diwali will be sweetened by the amount – Swati Koyte
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 21 Oct , 10.00 Am
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : समता स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या आर्ट वोल्कॅनो या प्रदर्शनातून मिळणारी सर्व रक्कम शिर्डी येथील साई अनाथालयाला दीपावली गोड करण्यासाठी देणार असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी कलश मंगल कार्यालय येथील प्रदर्शन प्रसंगी दिली.
यावेळी डॉ दत्तात्रय मुळे म्हणाले, विद्यार्थीला शाळेतून त्याला मिळणारे शिक्षण, संस्कार हे त्याच्या उज्वल भविष्याची ओळख असते. आपल्यातील कलागुणांचा वापर कसा करायचा या मार्गदर्शनामुळे समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमधून मोठ – मोठे कलाकार, शिल्पकार घडतील असे गौरवौद्गार त्यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ श्री व सौ. डॉ. दत्तात्रय मुळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले
कार्यक्रमास सौ.मुळे डॉ.राजेश श्रीमाळी, डॉ.रामदास आव्हाड , पत्रकार सतीश वैजापूरकर , समता महिला बचत गटाचे अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समता इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यवाह संदीप कोयटे व सौ.स्वाती कोयटे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
एक प्रदर्शन नसून एक सूचनात्मक उत्सव असल्याच्या भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची माहिती शिक्षिका सौ.सारिका अग्रवाल यांनी उपस्थितांना करून दिली. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला विद्यार्थ्यांचे पालक आणि उपस्थित कोपरगावकर यांनी भेट देऊन विविध वस्तू खरेदी करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
सुत्रसंचालन विद्यार्थिनी दिवा सांड व स्वरूपा दास यांनी केले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी स्कूल कला विभाग प्रमुख विभावरी नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार उप प्राचार्य समीर अत्तार यांनी मानले.
Post Views:
181