निवारा महादेव मंदिरात राज्यातील पहिली डिजिटल दानपेटी; आता दान थेट बँक खात्यात जमा होणार  

निवारा महादेव मंदिरात राज्यातील पहिली डिजिटल दानपेटी; आता दान थेट बँक खात्यात जमा होणार  

State’s first digital donation box at Nivara Mahadev Temple; Now the donation will be deposited directly into the bank account

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 22 Oct , 16.20 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : येथील समता नागरी पतसंस्था संस्थापक काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानात नेहमीच अग्रेंसर आहे याच पुढाकारातून कोपरगाव निवारा महादेव मंदिरात राज्यातील पहिली डिजिटल दानपेटी लोकार्पण सोहळा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते शनिवारी (२२) मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी  निवारा भजनी मंडळाचे प्रमुख बाबासाहेब कापे, माऊली गायकवाड, वाकचौरे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती .

निवारा परिसराचे माजी नगरसेवक जनार्दन कदम म्हणाले, ‘डिजिटल दानपेटी देऊन समता नागरी सहकारी पतसंस्थेने डिजिटल क्रांतीत बाजी मारली आहे. या दानपेटीमुळे मंदिरातील दानपेटी चोरीस जाण्याचे प्रकार आता यापुढे घडणार नाहीत; तसेच आता  सुट्टे पैसे मोजण्याचा  त्रासदेखील होणार नाही. शिवाय भाविकांनी केलेले सर्व दान महादेव मंदिर कमिटीच्या नावाने समता पतसंस्थेत असलेल्या बचत खात्यात रोज जमा होईल. या रकमेवर ७ टक्के व्याजही मिळेल.’
समताचे सहायक सरव्यवस्थापक संतोष मुदबखे  म्हणाले, ‘समता पतसंस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानातुन  जागतिक पातळीवर डिजिटल दानपेटीचा हा पहिलाच प्रयोग आहे. या दानपेटीच्या अनुषंगाने सर्व भाविकांचे डिजिटल दानही सुरक्षित होईल.’ लांडी लबाडी चोरी याला आळा बसणार आहे
याप्रसंगी निवारा भजनी मंडळाचे हौशीराम बर्गे, दिलीप संगमनेरे, प्रवीण कोल्हे, विजय कांगुने, मिलिंद जोशी गुरू, तसेच निवारा महिला भजनी मंडळाच्या महिला, निवारा परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page