सोयाबीन पोटी एकरी ११५० पिक विमा ही तर शेतकऱ्यांची थट्टा! कंपनीने मीठ चोळले … आता न्यायालयात जाणार 

सोयाबीन पोटी एकरी ११५० पिक विमा ही तर शेतकऱ्यांची थट्टा! कंपनीने मीठ चोळले … आता न्यायालयात जाणार 

1150 acre crop insurance for soybeans is a mockery of farmers! The company rubbed the salt … will now go to court

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 22 Oct , 16.10 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शेतकऱ्यांनी पिकविम्यात सर्वाधिक सोयाबीनचा पिकविमा काढला होता, त्यासाठी हेक्टरी ४५० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे भरणा केली होती तर १०० रुपये ऑनलाईन विमा भरण्यासाठी लागले होते.सोयाबीन पोटी एकरी ११५० पिक विमा  ही तर शेतकऱ्यांची थट्टा असून विमा कंपनीने  आधीच कर्जात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून  आता न्यायालयाचा आधार घेण्याच्या तयारीत  अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत.

आधिच शेतकरी गेल्या तीन चार वर्षांपासून विविध संकटांना तोंड देत आर्थिक संकटात सापडलाय आणि दुसरीकडे विमा कंपन्या देखील शेतकऱ्यांची थट्टा करतांना दिसत आहेत. 
कोपरगाव तालुक्यात  सततच्या पावसामुळे सोयाबीन, तुर, उडीद, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.  उशिराने का होईना मागील दोन दिवसांपासून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान एकरी चार ते पाच किलोचे झाल्याचे दाखवण्यात आले आणि त्यानुसार पैसे खात्यात जमा केले जात आहेत त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 
दरम्यान, शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे पिकविमा कंपनीने किमान हेक्टरी ४० ते ४३ हजार रुपये नुकसान भरपाई देणे अपेक्षित असतांना भरलेल्या प्रीमियमपेक्षा दुप्पट म्हणजेच  ११५० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असताना एक प्रकारे जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.ही अत्यंत दुर्दैवी बाब  असून विमा कंपन्यांच्या विरोधात चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांना संघटित करून न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे मधुकर खरात व प्रल्हाद होन यांनी सांगितले आहे.
चांदेकसारे सोनेवाडी पोहेगाव घारी देर्डे कोराळे देर्डे चांदवड परिसरातील शेतकऱ्यांवरही हाच अन्याय झाला असल्याचे लक्षात आले.
त्याच विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांनी विमा उतरवला असताना त्यांना मात्र अठरा हजाराच्या वरती नुकसान भरपाई मिळाली. मग मात्र इतर  शेतकऱ्यावर सारखीच नुकसान झाली असताना विमा कंपनीने अन्याय कसा केला असा प्रश्न खरात व होन यांनी उपस्थित केला.
  एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी सह अन्य पिक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईची अत्यल्प रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.  शेतकरी सहन करणार नसल्याचे जाहीर करत मधुकर खरात व प्रल्हाद होन यांनी शेतकऱ्यांना एकत्र करत न्यायालयात विमा कंपनीच्या विरोधात दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page