कोपरगावमध्ये आनंद शिधा किट प्रतिक्षा संपली : शिंदे-फडणवीस सरकारचे दिवाळी गिफ्ट
The Anand Shidha Kit wait is over in Kopargaon: Shinde-Fadnavis government’s Diwali gift
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 23 Oct , 19.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगावमध्ये आनंद शिधा किटची प्रतिक्षा संपली. शिंदे-फडणवीस सरकारचे दिवाळी गिफ्ट, यात शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर यांचे प्रत्येकी एक-एक किलो, तर एक लीटर तेल असे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी गोड जाणार आहे. रविवारी (२३) रोजी दुपारी प्रत्यक्ष रेशन पॅकेज आल्यानंतर तहसीलदार विजय बोरूडे यांच्या हस्ते आनंद शिधा किट वाटप शुभारंभ करण्यात आला.
राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. कोपरगाव सह तालुक्यात रविवार दुपारीनंतर रेशन घेऊन गाड्या रवाना झाल्या आहेत. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहेत. कोपरगाव महसूल अधिकारातील कार्यक्षेत्रातील ११३ रेशन दुकानाच्या माध्यमातून ४४ हजार ६८ अंत्योदय कार्ड लाभधारकांना आनंद शिधा किट प्रत्यक्ष सोमवार दुपारपर्यंत मिळेल. यासाठी ट्रकचालक, हमाल, व पुरवठा विभागाचे कर्मचारी घरी दिवाळी असतानाही काम करून वाटप करणार आहेत . हे पॅकेज १०० रुपयात मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांची दिवाळी गोड होणार आहे असे तहसीलदार विजय बोरुडे यांनी सांगितले.
आनंद शिधा किट वाटप नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक दीपक भिंगारदिवे यांनी आमच्या प्रतिनिधीकडे दिली.