नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा-आ. आशुतोष काळे
Take action on a war footing to help the victims. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 23 Oct , 19.10 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : विधानसभा मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील अतिवृष्टीच्या नुकसान ग्रस्तांना तातडीने मदतीसाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
गुरुवारी (दि.२०) रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने दाणादाण उडवून देत संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला झोडपून काढले. आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राहात्याचे नायब तहसीलदार भाऊराव भांगरे, कामगार तलाठी वर्षा कावनपुरे, श्रीम. भारती लोखंडे, सोमनाथ शिंदे, ग्रामविकास अधिकारी तुळशीदास दिनकर, प्रमोद कानडे, सतीश दिघे, कृषी सहाय्यक किरण शिंदे, अजय डाके, संदीप गायकवाड आदी अधिकाऱ्यांच्या समवेत नपावाडी, शिंगवे, रस्तापूर आदी गावातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेवून प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती जाणून घेतली. गुरुवार (दि.२०) रोजी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाकडे पाठवा व लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत द्या काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.
Post Views:
193