ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले कोपरगाव विसपुते सराफ
Kopargaon Vispute Saraf is a popular choice among customers
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue25 Oct , 20.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: कोपरगाव शहर तालुका व पंचक्रोशी मध्ये गेल्या २५ वर्षांपासून अधिक काळ दागिन्यांच्या विश्वात ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले एकमेव नाव म्हणजे कोपरगावचे विसपुते सराफ होय. विनम्र, प्रामाणिक व पारदर्शक सेवा; तसेच उत्तम दर्जा यांच्या बळावर सुवर्णालंकार व्यवसायामध्ये विसपुते सराफने मानाचे स्थान निर्माण केले आहे. चोख व्यवहारांमुळे ग्राहकांना आपलेसे केले आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी सोने, चांदी व हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्यासाठी विसपुते सराफला कोपरगाव येवला राहता सिन्नर वैजापूर संगमनेर या तालुक्यांनी सुद्धा पसंती दिली आहे.
जन्माने सुवर्णकार असतानाही दीपक विसपुते यांचे आजोबा, वडील सराफी व्यवसाय करत नव्हते. परंतु १९९१ साली दीपक विसपुते यांनी राजकोट येथील पदवी संपादन करून सोन्या चांदीच्या दागिन्यांचे कारागिरीचे काम एका दुकानात सुरू केले तब्बल सहा ते सात वर्षे कारागिरीचे काम केल्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने स्वतःचे दुकान सुरू केले. दिपक विसपुते यांनी १९९८ मध्ये सराफ बाजार येथे पहिली शाखा स्थापन केली. ग्राहकांचा विश्वास व सहकार्याच्या जोरावर यांनी या व्यवसायाची धुरा सांभाळली. अवघ्या दीड तपानंतर २०१६ मध्ये त्यांनी शहरातील गजबजलेल्या व महत्त्वाच्या अशा संभाजी चौक येथे वातानुकूलित तीन मजली प्रशस्त दालन सुरू केले; तसेच मोठ्या शहराप्रमाणे सोने चांदी हिऱ्याचे स्वतंत्र दालन केले. चांदीच्या दालनातून तर यावर्षी नाशिक पेक्षाही ज्यादा व्यवसाय मिळाल्याचे दीपक विसपुते यांनी सांगितले .
यावेळी अधिक माहिती देताना विसपुते सराफ संचालक यश विसपुते म्हणाले,
दागिन्यांच्या पारंपरिक प्रकारांबरोबरच आधुनिक फॅशनच्या दागिन्यांचे कुंदन वर्क; तसेच पोलकी यांसारखे राजवाडा कलेक्शन, बंगाली पद्धतीचे कलकत्ता ज्वेलरी या सर्व प्रकारच्या दागिन्यांचा समावेश करण्यात आला आहे. डायमंड दागिन्यांचा प्रशस्त स्वतंत्र विभाग सज्ज आहे. सध्या दालनामध्ये युवा पिढीला साजेशा एक्झिक्युटिव्ह ज्वेलरीला चांगली मागणी आहे. अत्याधुनिक ज्वेलरीसह पारंपरिक मोहनमाळ, राणीहार, पोटेहार, लक्ष्मीहार, ठुशी, बोरमाळ, गंठण, टेंपल ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी यांना महिलावर्गाकडून मोठी मागणी आहे. खास लग्नसमारंभासाठी लागणारे दागिने उपलब्ध आहेत. खास दिवाळीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात सिल्व्हर गिफ्ट आर्टिकल्स, इटालियन ज्वेलरी, सिल्व्हर लाइफ स्टाइल प्रॉडक्ट्स आणि कार्पोरेट गिफ्ट प्रॉडक्ट्स, पूजासामग्री, सिल्व्हर कॉइन्स; तसेच भव्य साईजमधील मनमोहक, कलात्मक विविध देवी-देवतांच्या फोटो फ्रेम्स आदी आकर्षक व भव्य रेंज उपलब्ध आहेत.प्रत्येक दागिना हॉलमार्क प्रमाणित आहे. सध्या सुरू असलेल्या वार्षिक बचत योजनेला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे; तसेच दागिने खरेदीसाठी बॅंकेमार्फत सुलभ हप्त्याने कर्ज उपलब्ध होत आहे. ‘ दिवाळी ’ महोत्सवात ग्राहकांना प्रत्येक सोन्याच्या दागिन्याच्या खरेदीवर मजुरीमध्ये २५% सूट तर डायमंड दागिन्यांच्या मजुरीवर ५०% सूट दिली जात आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी संचालक प्रेम विसपुते म्हणाले
विसपुते सराफ यांच्यामार्फत वर्षातील साधारण तीन गुरुपुष्यामृत अक्षय तृतीया गुढीपाडवा धनतेरस दिवाळी पाडवा या विशेष मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांना आकर्षक अशी सूट दिली जाते. तसेच आज दहा ग्रॅम सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या त्या दागिन्यांचा मोफत विमा विसपुते सराफ मार्फत उतरविला जातो. राशीरत्न मोफत सल्ला मागील अनेक वर्षांपासून विसपुते सराफकडून जन्म तारीख व नावानुसार लागणाऱ्या राशीरत्नांचा मोफत सल्ला दिला जातो. सर्व प्रकारचे ओरिजिनल, सर्टिफाईड रत्न येथे उपलब्ध आहेत. त्यास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ऑनलाईन खरेदीची सुविधा विसपुते सराफकडून उपलब्ध असून भारताबाहेरही विविध देशात विसपुते सराफमधील दागिने जातात.
दीपक विसपुते म्हणाले अमेरिका, जर्मनी, जापान, न्यूझीलंड अशा विविध देशात शहरातील नागरिक राहतात. ते सोने खरेदीस विसपुते सराफला पसंती देत असून ते ऑनलाईन माध्यमातून ज्वेलरी बुकींग करतात. त्याची ऑनलाईन डिलिव्हरी मागवतात किंवा भारतात आल्यानंतर ते खरेदी करतात. अनेकदा विविध भारतीय सणांना विदेशात राहणाऱ्या मुलामुलींचे पालक येथून त्यांच्या पसंतीचे दागिने खरेदी करून त्यांना पाठवत असतात. आपल्या देशातील व आपल्या विश्वासाच्या दालनातून मिळालेले दागिने थेट सातासमुद्रापार मिळत असल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. येथे येतांना ग्राहक एक लाखाची खरेदी करण्याचे उद्देशाने येतो आणि बघता बघता दोन ते तीन लाखाची खरेदी करून जातो याला कारण आलेला ग्राहक हा वेगवेगळे शहरात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या दुकानात फिरून आलेला असतो तेथील अनुभव नाविन्यपूर्ण दागिने व दरातील तफावत पाहून खरेदीचा मोह त्याना आवरत नाही असे अनेक ग्राहक आवर्जून सांगतात. यावेळी त्यांनी येवला येथील वर्मा या ग्राहकाचे उदाहरण दिले.
कोट
विसपुते सराफचे राजेंद्र नाईकसर हे
ग्राहक म्हणाले की, मी जवळजवळ दहाबारा वर्षापासून याच ठिकाणावरून दागिने खरेदी करतो. प्रत्येक पिढीच्या आवडीनिवडी नुसार व्हरायटी येथे उपलब्ध असते. कोणते दागिने खरेदी करावयाची याबाबत ते विश्वासाने मार्गदर्शन करतात कर्मचारी वर्ग सौजन्याने सेवा देतो.इथे घरच्यासारखी सेवा मिळते त्यामुळे दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही.
कोट
स्मिता सोमोसे मॅडम म्हणाल्या की, फॅन्सी व्हरायटी वाजवी दर निवडीसाठी भरपूर पर्याय, ट्रेडी, लाईट वेटेड ज्वेलरी येथे उपलब्ध असते. त्यामुळे गेल्या २४ वर्षापासून आम्ही येथे खरेदी करीत आहोत नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी जाण्याचा विचारही मनाला शिवत नाही. एक प्रकारचा विश्वास व आपलेपणाची भावना येथे निर्माण होते. त्यामुळे दागिने खरेदी करतांना कोणताही संकोच वाटत नाही.—-
आपल्या व्यवसायातील यशाचे गमक सांगताना दीपक विसपुते म्हणतात मी व्यवसायापेक्षा ग्राहकांच्या समाधानाला आणि अपेक्षेला महत्त्व दिले. नवीन नवीन व्हरायटी देताना मोठे धाडस केले कोपरगाव सारख्या ठिकाणी फॅन्सी दागिने त्यातील डेड इन्व्हेस्टमेंटला न घाबरता नवीन नवीन देत गेलो माझ्या या धाडसाला ग्राहक प्रतिसाद देत गेले मी एकटा निघालो आणि माणसे जोडत गेलो मला यश मिळाले आणि आता मी ठरवून टाकले हाच माझा आता पिढी जात व्यवसाय आहे मी माझी मुले यश विसपुते व प्रेम विसपुते या दोघांनाही उच्च शिक्षण दिले आहे परंतु त्यांना उच्चशिक्षित करूनही या व्यवसायातच आणले आहे
चौकट
२०२३ हे विसपुते सराफ दालनाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे यानिमित्त जानेवारी २०२३ पासून ते दिवाळीपर्यंत वर्षभर रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार असून वर्षातील साधारण तीन गुरुपुष्यामृत, अक्षय तृतीया, गुढीपाडवा, धनतेरस व दिवाळी पाडवा या विशेष मुहूर्ताशिवाय रौप्य महोत्सवानिमित्त ग्राहकांना मंगळसूत्र महोत्सव, बांगडी महोत्सव साजरे करण्यात येणार आहे या निमित्त ग्राहकांना चांगले गिफ्ट ही देण्याचा विचार दीपक विसपुते यांनी व्यक्त केला आहे.