कोपरगावचे किराणा व्यापाऱ्यांनी काळानुसार व्यवसाय बदल करावे  – तनसुख झांबड

कोपरगावचे किराणा व्यापाऱ्यांनी काळानुसार व्यवसाय बदल करावे  – तनसुख झांबड

Grocers of Kopargaon should change business with time – Tansukh Zambad

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 1 Nov , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  सकारात्मक मानसिकता कोपरगावातील युवा किराणा व्यापाऱ्यांकडे आहे. तेच कोपरगावला पुन्हा कॅलिफोर्निया म्हणून ओळख निर्माण करून देतील मात्र डिजिटल तंत्रज्ञानाद्वारा बदलत्या काळानुसार व्यवसायातही बदल करावेत.असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे व्हा.चेअरमन तनसुख झांबड यांनी समता पतसंस्थेच्या  स्व यशवंतराव सभागृहातील कार्यक्रमात केले . अध्यक्षस्थानी किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक  काका कोयटे हे होते.

       राम बंधु मसालेचे चेअरमन हेमंत राठी  म्हणाले की, काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली  युवा किराणा व्यापाऱ्यांसाठीचा प्रोत्साहनपर सोहळा हा निश्चितच स्तुत्य असून कौतुकास्पद आहे.हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही कुठे झालेला नसेल त्यामुळे काका कोयटे यांच्या कल्पकतेला दाद द्यावी लागेल.

    
 प्रास्ताविक कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष .राजेंद्र बंब यांनी केले 
      काका कोयटे म्हणाले की,  कोपरगावातील युवा किराणा व्यापाऱ्यांनी मॉल संस्कृती आणि ऑनलाईन खरेदी,विक्री कशी फसवी आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान आणि कल्पनाशक्ती द्वारा कोपरगावकरांना दाखवून दिले.  
     पवन डागा, पुष्पक डागा, सार्थक बंब यांनी मनोगत व्यक्त  केले.   सुत्रसंचालन व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले. यावेळी किराणा मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष चांगदेव शिरोडे, नारायण अग्रवाल, केशवराव भवर,गुलशन होडे,किरण शिरोडे, दीपक अग्रवाल आदींसह कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे आभार  नारायण अग्रवाल यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page