प्रमोद लबडे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी तर सनी वाघ यांची कोपरगाव शहर प्रमुखपदी निवड
Pramod Labde was elected Shiv Sena District Pramukh and Sunny Wagh as Kopargaon City Pramukh
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 3 Nov , 10.50 Am
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :- शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कोपरगाव येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्याचसोबत कोपरगाव येथील सनी वाघ यांची कोपरगाव शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
कोपरगाव येथील उध्दव ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांची कोपरगाव, श्रीरामपुर, नेवासा या तीन तालुका विधानसभा जिल्हाप्रमुख पदी निवड झाली.यापूर्वी त्यांनी उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केले होते. यामुळे कोपरगाव येथे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला विश्वास हा सार्थ ठरवत जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी काम करू असा विश्वास प्रमोद लबडे यांनी व्यक्त केला
तसेच कोपरगाव येथील माजी शहरप्रमुख सनी वाघ यांची कोपरगाव शहर प्रमुखपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा करत सनी वाघ यांचा सत्कार केला. युवक कार्यकर्त्यांनी केलेला सन्मान म्हणजे माझा एकट्याचा नसून तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकाचा आहे. तसेच या सत्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली.