कोपरगाव ते वणी सप्तशृंग गड पदयात्रा रवाना.
Depart for Kopargaon to Vani Saptshring Fort Padayatra.
पराग संधान यांनी झेंडा दाखवला Parag Sandhan showed the flag.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue8 Nov , 19.20 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील सुभाषनगर भागातील जय मातादी ग्रुपच्या वतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी शहरातील सुभाष नगर ते वणी सप्तशृंग गड पदयात्रा काढण्यात आली आहे. अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला.
पदयात्रेचे नववे वर्ष आहे. कोपरगाव ऐतिहासिक गोदाकाठ असून येथील इतिहास तरुणांनी पदयात्रेतील गावोगाव सांगावा आणि नागरिकांना सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे असे आवाहन पराग संधान यांनी यावेळी बोलताना केले.
प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी अल्ताफभाई कुरेशी, रिपाइं (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, फकीर महंमद पहिलवान, राहुल रिळ, शेखर रिळ, कृष्णा रिळ, विक्की टाक,निखिल झांजरे, विकास चव्हाण, योगेश पवार, रोहित रिळ, संजय रिळ, अतुल सौंदे, शुभम घोगले, आकाश मरसाळे, आकाश रिळ, सनी रिळ, सुमित रिळ, विक्की रिळ, राजू लोंढे, अमोल लोखंडे, मनोज शिंदे, आसिफ शेख, निखिल शेजवळ, अजय पगारे, रोहित चावरे, संदीप डाके, सागर डाके,प्रकाश चव्हाण,गोलू पवार,उमेश पारचा,दीपक उज्जैनवाल,संतोष पगारे आदी भाविक सहभागी झाले होते.
Post Views:
356





