खुले नाटयगृह: ‘ते’ ठेकेदार जावई नाहीत; त्यांच्यावर तातडीने कारवाई करा : संधान कडाडले!
Open Theatre: ‘They’ are not contractor sons-in-law; Take immediate action against them: the Sandhan is tight!
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue8 Nov , 19.40 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मंजूर झालेले काम वेळेत सुरू करून पूर्ण करण्याची ज्यांची ऐपत आहे, अशाच ठेकेदारांनी कामे घ्यावीत. काम मंजूर करून घेऊन अनेक ठेकेदार काम करत नाहीत. ते ठेकेदार काय जावई नाहीत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी यांनी नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे सोमवारी तहसीलदार कार्यालयात झालेल्या शहरातील विविध प्रश्नांच्या बैठकीत केली आहे.
या बैठकीत पालिका संदर्भातील विविध प्रश्न व तक्रारीबाबत बोलताना अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान यांनी या सूचना केल्या आहेत.
कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामासाठी ११ जून २०२१ रोजी ठेकेदारास कार्यारंभ आदेश दिलेला आहे. बारा महिन्यांत हे काम पूर्ण करावयाचे आहे; पण दीड वर्षे उलटूनही ठेकेदाराने अद्याप हे काम सुरू केलेले नाही. कुणाच्या राजकीय दबावाखाली येऊन हे काम रखडवण्यात आले आहे, असा सवाल संधान यांनी उपस्थित केला.
पराग संधान यांनी नगरपालिका बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल तक्रार केली. कामे मंजूर आहेत; परंतु ती सुरू होत नाहीत. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात लागेबांधे आहेत. त्यांच्यात साटेलोटे होते आणि तक्रार करूनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा संधान यांनी उपस्थित केला. ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात लागेबांधे असणे चुकीचे आहे. काम न करणाऱ्या व या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पराग संधान यांनी केली.
संधान यांनी त्या बैठकीत कोपरगाव शहरात १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने खडकी, गोकुळनगरी, निवारा, कर्मवीरनगर, ब्रिजलालनगर, संजयनगर, सुभाषनगर आदी भागात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या काळात नागरिकांवर अस्मानी संकट कोसळले. भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व नागरिकांनी वारंवार मागणी करूनही नगर परिषद प्रशासनाने या परिसरात साचलेले पावसाचे पाणी उपसण्याकडे व नुकसानीचे पंचनामेकरण्यास दिरंगाई केली. नगर परिषद प्रशासनाचा हा चालढकलपणा कशासाठी? न. प. प्रशासन कुणाच्या इशाऱ्यावर असे करत आहे? दरवर्षी पावसाळ्यात खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगरसह शहराच्या अनेक भागात पावसामुळे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी संधान यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.
Post Views:
426





