बस सेवा सुरळीत करा विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय करू नका- आ. आशुतोष काळे

बस सेवा सुरळीत करा विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय करू नका- आ. आशुतोष काळे

Make the bus service smooth, don’t inconvenience the students and passengers. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 9 Nov , 18.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव – कोरोना गेला प्रवाशांची संख्या वाढली आता एसटी सेवा सुरळीत करून विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या अशा सक्त सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव बस आगार प्रमुख अभिजीत चौधरी यांना दिल्या 

कोपरगाव आगारातून सुटणाऱ्या ग्रामीण भागातील विविध गावांच्या ठिकाणी कोपरगाव आगाराच्या बस जात असतात.  कोरोना महामारीचे संकट टळले असून  जनजीवन पूर्वपदावर आले आहे.  त्याचा प्रत्यय दिवाळीच्या काळात प्रवाशांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसून आला आहे.

नुकतीच दिवाळीची सुट्टी संपली असून सर्व शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत. त्याचबरोबर लग्नसराई  देखील सुरु झाली असल्यामुळे एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या व शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. तसेच एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये महिला, अपंग व जेष्ठ नागरिकांची संख्या देखील मोठी असते व बहुतांश प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने एस. टी.ने प्रवास करण्यालाच प्राधान्य देतात व असंख्य विद्यार्थ्यांचे शिक्षण देखील याच एस. टी. वर अवलंबून आहे.मात्र अजूनही काही गावात एस. टी. येत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे आर्थिक नुकसान होत असून सुरीक्षततेचा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी योग्य नियोजन करून एस. टी.ची सेवा  सुरळीत करावी व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी आगारप्रमुख अभिजित चौधरी यांना दिल्या आहेत.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page