डॉ.कांचन अर्जुन होन यांची एम. डी. (बालरोग) वैद्यकिय शिक्षणक्रमासाठी निवड
Dr. Kanchan Arjun Hone’s M. D. (Paediatrics) Selection for Medical Course
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 9 Nov , 18.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील सोनेवाडी येथील प्रा. डॉ अर्जुन होन यांच्या कन्या डॉ कांचन अर्जुन होन यांची नुकतीच नीट पी. जी. २०२२ वैद्यकिय परीक्षेद्वारे महाराष्ट्र राज्य कोट्यातून एम.डी. बालरोग या पदव्युत्तर पदवी वैद्यकिय शिक्षणक्रमासाठी निवड झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी डॉ कांचन होन हया रवाना झाल्या आहेत.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, मिरज, सांगली येथे त्या आपले पुढील शिक्षण पूर्ण करणार आहेत.या अगोदर त्यांनी एम.बी.बी. एस.शिक्षण नायर मेडीकल कॉलेज मुंबई येथे पुर्ण केले आहे. तलासरी येथील गोदावरी परुळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अर्जुन होन यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठक्करबापा आश्रम शाळा तलासरी येथे तर माध्यमिक शिक्षण पोस्ट बेसिक आश्रम शाळा झरी येथे झाले आहे. त्यांच्या या यशाबद्दल वैद्यकिय व्यावसायिक, शिक्षकवृंद व सोनेवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि मित्र परिवार यांच्याकडून विविध समाज माध्यमातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post Views:
452





