सोमैया महाविद्यालय डे नाईट हॉलीबॉल स्पर्धेत पुणे शहर संघ प्रथम
Pune City Team First in Somaiya College Day Night Holley Tournament
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 9 Nov , 18.40 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, अहमदनगर आंतरविभागीय क्रीडा समिती व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने के जे सोमय्या महाविद्यालयात आयोजित डे नाईट आंतरविभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पुणे शहर संघाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार कै. के.बी.रोहमारे (साहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धा आठ व नऊ नोव्हेंबर रोजी पार पडल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दत्ता महादम, संस्थेचे विश्वस्त संदिप रोहमारे्, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या हस्ते संपन्न झाले होते.
स्पर्धेत पुणे शहर, पुणे ग्रामीण, नाशिक व अहमदनर या चार विभागांच्या संघाने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पुणे शहर संघाने , द्वितीय क्रमांक नाशिक संघाने तर तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे पुणे ग्रामीण व नगर संघाने प्राप्त केला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, लायन्स मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक भास्कर गुरसळ तसेच विभागीय स्पर्धेचे निवड समितीचे सर्व सदस्य, संघांचे संघव्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शा.शि.संचालक डॉ.सुनिल कुटे व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक मिलिदं कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views:
295





