मुख्याधिकारी गोसावी यांच्या आश्वासनानंतर संजय काळे यांचे  निषेध आंदोलन मागे

मुख्याधिकारी गोसावी यांच्या आश्वासनानंतर संजय काळे यांचे  निषेध आंदोलन मागे

Sanjay Kale’s protest movement called off after Principal Gosavi’s assurance

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir11 Nov , 17.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : विनापरवाना फलकामुळे शहराचे  विद्रुपीकरण होत असल्याने अशा फलकावर कारवाई करीत फौजदारी दाखल करण्याचे आश्वासन नपा मुख्याधिकारी शांताराम गोसावी  यांनी  आंदोलक सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना दिल्यानंतर शुक्रवारी (११) सकाळी नगरपालिकेत  फ्लेक्स संबंधीच्या अर्धवट कारवाईचा काळा झेंडा दाखवत केलेलं निषेध आंदोलन मागे घेतले  आहे .

शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर अनेक डिजिटल फलक हे विनापरवाना उभारले जात आहेत. यामध्ये राजकीय पक्ष, संघटना यांचे बॅनर झेंडे अन्य फलक, जाहिरात कंपन्यांचे फलक तसेच अनेक व्यावसायिकांनी, दुकानदार यांनी आपल्या व्यवसायाच्या दर्शनी बाजूस नगर पालिकेच्या परवानगी विना आणि कोणतेही जाहिरात शुल्क न भरता जाहिरात फलक उभारले आहेत.अशा अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगमुळे शहर विद्रूप होत असून त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली असून शुक्रवारी (४) नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ पोलीस स्टेशन समोर उन्हात उभे राहून खडा सत्याग्रह केला होता. त्यावेळी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु गुन्हे दाखल न झाल्याने आज  संजय काळे यांनी निषेध आंदोलन केले होते.
फौजदारी दाखल का केले नाहीत ? 
या विनापरवाना फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशा फलकावर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शहर पोलीस स्टेशन समोर खडा सत्याग्रह केला होता त्यावेळी पालिका व पोलीस अधिकारी यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते शहरातील डिजिटल फलक काढण्यात आले परंतु ज्यांनी ते लावले होते त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत या कारणास्तव सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी शुक्रवारी (११) रोजी  सकाळी नगरपालिकेत मुख्याधिकारी दालनाच्या बाहेर काळा झेंडा हातात घेऊन प्रशासनाच्या अर्धवट कारवाईचे निषेध आंदोलन केले होते याची दखल घेत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी त्यांना सदर प्रकरणी  फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील अशी ग्वाही दिली यावर समाधान झालेले संजय काळे यांनी आपले निषेध आंदोलन स्थगित केले 
 सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना उभारलेले आणि खासगी जागेत जाहिरात शुल्क न भरता लावण्यात आलेले जाहिरात फलक नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने उतरवले होते . फलकाचे सांगाडे मात्र तसेच होते तेही आज उतविण्यात आले
 सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांच्याशी बोलताना मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, आमच्या अधिकाऱ्यांनी उतरविण्यात आलेल्या फलकांचे फोटो काढलेले असून त्यानुसार संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. 
खंदकनाल्यात उभारण्यात आलेले प्रार्थना स्थळ काढण्यात आले असून खंदक नाल्याच्या अतिक्रमणाबाबत भूमापन विभागाकडून हद्द प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल तसेच इंडोर गेम  येथील जागेत खेळाडूंसाठी व्यवस्था करण्यात येईल तसेच रात्री सुद्धा खेळता येण्यासाठी प्रकाश झोताची व्यवस्था करण्यात येईल अशी आश्वासन शांताराम गोसावी यांनी यावेळी काळे यांना दिले
ज्या जाहिरात फलक धारकांनी खासगी जागेत आपले जाहिरात फलक उभारले आहेत. त्यांनी त्या जाहिरात फलकाचे जाहिरात शुल्क नगरपालिकेकडे रीतसर भरावे आणि अन्यथा अशा खासगी जागेतील आणि सार्वजनिक जागेतील जाहिरात फलकावर कायदेशीर कारवाई करीत फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशारा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page