काळे गटाचे कार्यकर्ते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये
In BJP in the presence of kale group activist Sudhir Mungantiwar
बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांच्याकडून स्वागत Welcome by Bipindada Kolhe, Snehalata Kolhe, Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir18 Nov , 17.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील काळे गटातील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि इतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. काळे गटातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे काळे गटाला मोठा हादरा बसला आहे.
यावेळी शिंगणापूर येथील काळे गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठमाजी संवत्सरकर, अंकुश गणपत संवत्सरकर, लहू गणपत संवत्सरकर, संतोष मारुती कुऱ्हे, कैलास पुंजाराम मगर, रामनाथ भिका संवत्सरकर, सुनील रामनाथ संवत्सरकर, बापू ज्ञानदेव संवत्सरकर, सोनू अंकुश संवत्सरकर, स्वप्नील सोनवणे, मधुकर ठमाजी संवत्सरकर, विक्रम ठमाजी संवत्सरकर, संदीप लहू संवत्सरकर, सुनील प्रकाश आढाव तसेच शिवसेनेचे शिंगणापूर गटप्रमुख रवींद्र चंद्रभान शिंदे (चांदगव्हाण) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे ना. सुधीर मुनगंटीवार, बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी पक्षात स्वागत केले.
Post Views:
206