सहकारमहर्षी कोल्हे  साखर कामगार पतपेढी अध्यक्ष  देवकर तर उपाध्यक्ष उगलमुगले  बिनविरोध .

सहकारमहर्षी कोल्हे  साखर कामगार पतपेढी अध्यक्ष  देवकर तर उपाध्यक्ष उगलमुगले  बिनविरोध .

Sahkar Maharshi Kolhe Sugar Workers Credit Bank President Deokar and Vice President Ugalmugle unopposed.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon21 Nov , 20.10 Pm
By राजेंद्र सालकर

 कोपरगांव :   राज्यात नावाजलेल्या व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी देवकर केदू देवकर तर उपाध्यक्षपदी सुदाम नामदेव उगलमुगले यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार कामगार पतपेढीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची घोषणा सोमवारी निवडणुक निर्णय अधिकारी आर. एन. राहणे यांचे अध्यक्षतेखाली तर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. प्रारंभी व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
         अध्यक्ष देवराम देवकर यांच्या नावाची सूचना संचालक विलास गोरखनाथ कहांडळ यांनी केली तर त्यास केशव गोविंद बटवाल यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष सुदाम उगलमुगले यांच्या नावाची सूचना सुरेश कोंडीराम मगर यांनी मांडली तर उत्तम भानुदास शेळके यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी संचालक सर्वश्री. साईनाथ पंढरीनाथ तिपायले, सुभाष धर्माजी होन, अण्णासाहेब वसंत पगारे, नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
           अध्यक्ष देवराम देवकर सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, सहकारमहर्षी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारधारेवर तालुक्यात सहकारी चळवळीचा पाया मोठ्या प्रमाणात मजबूत झालेला असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे या प्रगतीत मोलाची भर घालत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कामगार पतपेढीची भरभराट अधिक जोमाने करू. या निवडीबद्दल त्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी संचालक, साखर कामगार नेते मनोहर शिंदे, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, उपमुख्य लेखापाल प्रवीण टेमगर, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. शेवटी व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले. कारखान्याच्या लेखाशाखेतर्फेही अध्यक्ष देवराम देवकर यांचा मुख्य लेखापाल एस. एन. पवार व सर्व सहकाऱ्यांनी सत्कार केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page