४०० पेक्षा जास्त दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिले – आ. आशुतोष काळे
More than 400 persons with disabilities got disability certificates – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon21 Nov , 20.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील दिव्यांगांना विशेष सुविधा उपलब्ध करून देवून जिल्हा रुग्णालयात तपासणी करून आजपर्यंत ४०० पेक्षा जास्त दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिले आहे अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी मागील दोन वर्षापासून मतदार संघातील दिव्यांगांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या दिव्यांगांना आ. आशुतोष काळे यांच्याकडून मोफत वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. या मोफत वाहन व्यवस्थेमुळे मतदार संघातील अनेक दिव्यांग बंधू-भगिनींची मोठी सोय होवून जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी येणारी अडचण दूर होवून आजतागायत ४०० पेक्षा जास्त दिव्यांगांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळवून देवून सरकारी योजनांचा फायदा मिळू लागला आहे.
मागील आठवड्यात देखील जवळपास ५० दिव्यांग बंधू-भगिनी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात तपासणी करून आले आहेत.त्यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापुढील काळातही हि सेवा अशीच सुरु ठेवून मतदारसंघातील प्रत्येक दिव्यांगाला दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू. मतदार संघातील ज्या दिव्यांगांना आजपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.