कोपरगाव शहरातील काळेंच्या  मतदार नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोपरगाव शहरातील काळेंच्या  मतदार नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Kalen’s voter registration camp in Kopargaon city

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue22 Nov , 17.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राबविलेल्या मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिरास उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

पुढील काही दिवसात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत पात्र मतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी व ज्या मतदारांची मतदार यादीत काही दुरूस्ती किंवा बदल करावयाचे आहेत अशा मतदारांसाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात मंगळवार (दि.२२) ते गुरुवार (दि.२४) या कालावधीत मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिर आयोजित केले आहे.

कोपरगाव शहरातील एकूण १५ प्रभागात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरास पहिल्याच दिवशी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नवमतदारांना नाव नोंदणी करण्यासाठी  शिबीरस्थळी सविस्तर माहिती देवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नवमतदारांचे अर्ज भरून घेतले जात आहे. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नाही, त्यांची देखील नावनोंदणी करून घेवून मतदार यादीतील नाव दुरुस्ती बरोबरच इतरही दुरुस्त्या या शिबिराच्या माध्यमातून होत असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे व मतदार नोंदणी करून आपल्याला मतदानाचा हक्क मिळणार असल्यामुळे नवमतदारांमध्ये आनंदाचे वातावरण  पसरले आहे.या शिबिराचा लाभ घेवून सर्व पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.  

Leave a Reply

You cannot copy content of this page