राज्यपाल कोश्यारी-त्रिवेदीं विरोधात कोपरगावात संताप; जोडे मारून वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
Outrage in Kopargaon against Governor Koshyari-Trivedi; Denial of controversial statements by pairing
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed23 Nov , 10.20 Am
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळं त्यांच्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. कोपरगाव शहरातील शिवसेना (उद्धव ठाकरे ) राष्ट्रवादी आणि मनसे यांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुंधाशु त्रिवेदी यांच्या विधानाचा समाचार घेत जोरदार घोषणा देत काही आंदोलकांनी कोश्यारींच्या व त्रिवेदी या दोघांच्या फोटोला जोडे मारत संताप व्यक्त केला.
यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले की, सर्वाच्च पदावर बसलेल्या व्यक्तींनी महापुरुषांबद्दल अपशब्द बोलणे हे बावळटपणाचे लक्षण आहे. त्यांना तत्काळ पदावरून हटविले पाहिजे. संतोष गंगवाल म्हणाले , कोश्यारीजी कोपरगावात या, तुमचे धोतर व टोपी उतरविल्या शिवाय राहणार नाही. अशॊक अव्हाटे म्हणाले, ही वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम आहे.
यावेळी कलविंदर डडियाल, महेमुद सय्यद, वर्षा शिंगाडे, रमेश गवळी,संतोष गंगवाल, सुनील फंड,योगेश गंगवाल,अनिल गायकवाड, कुक्कुशेठ सहानी,दिलीप सोनवणे, किरण खर्डे,संदीप दळवी, अरुण बोराडे,संतोष झावरे,अश्विनी होणे,अक्षिता आमले,राहुल देशपांडे, बाळासाहेब साळुंके, विकास शर्मा, सुनील कुंढारे,प्रफुल्ल शिंगाडे, वैभव गिते, दिपक बरदे,सागर सोमवंशी, मौलाना अफझल, मनोज नरोडे,अशोक अव्हाटे, महेश उदावंत, नवाज कुरेशी, संदीप कपिले, विक्रांत झावरे, दिपक चौधरी,किरण कुऱ्र्हे, अविनाश धोक्राट, मधू पवार,अशोक पवार, आकाश कर्डिले, सतीश खर्डे,उमेश छुगानी, अमोल सावजी, अक्षय क्षत्रिय,अनुप गिरमे,रवि पवार,संतोष पवार,गोविंद चव्हाण, मंगेश देशमुख, निखिल दिवटे, कन्हैय्या जोशी,दिनेश भालेराव, संदीप सावताडकर, कुंदन भारंबे, विजय सोनवणे, सुमित बोर्डे, विशाल झावरे व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.