सिंगल यूज प्लास्टिकवर कोपरगाव पालिकेची मोठी कारवाई, दंड वसूल

सिंगल यूज प्लास्टिकवर कोपरगाव पालिकेची मोठी कारवाई, दंड वसूल

Big action of Kopargaon municipality on single use plastic, fine will be collected

८० किलो प्लास्टिक जप्त, सात दुकानावर कारवाई ; ३५००० रुपये दंड वसुली80 kg of plastic seized, action taken against seven shops; 35000 fine recovered Rs

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir25 Nov , 18.40 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : कोपरगावात  सिंगल यूज (Single-Use Plastic) वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक विरोधातील मोहीम सुरू ठेवत, कोपरगाव नगरपालिकेत शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी शहरातील विविध दुकानात प्रतिबंधित साहित्य जप्त केले होते.

कोविड-19 महामारीच्या काळात ही मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली होती.
सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार आज मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, प्र. आरोग्य निरीक्षक सुनिल आरण व स्वच्छता अभियान नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे यांच्या पथकाने आज शहरात सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई केली. 
सदर कारवाईमध्ये शहरातील सात दुकानातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले. यात कॅरीबॅग, प्लॅस्टिकचे ग्लास, थर्माकोल पत्रावळ्या, सिल्व्हर कोटेड पत्रावळी आदींचा समावेश आहे. सदरील दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड परिषदेमार्फत ठोठावण्यात आलेला आहे.
कोपरगाव  शहरातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्स भागातील उमेश पहाडे, महाल्क्ष्मी प्लास्टिक व ठोळे ट्रेडर्स या दुकानातून, स्टँड परिसरातील अग्रवाल फरसाण ( संदीप अग्रवाल), मेन रोडवरील संजय फरसाण तर येवला रोड येथील बालाजी फरसाण व देशी दारू दुकान (हमीत सातरण सातपुते) यांच्याकडून जवळपास अंदाजे ७०-८० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.  
शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातलेली असतानादेखील शहरात विविध ठिकाणी सर्रास वापर होत आहे, यामुळे नगरपरिषदेने प्लॅस्टिकबंदीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अशाप्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून शहरातील दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी केले आहे.
सदर कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, प्र. आरोग्य निरीक्षक सुनिल आरण व स्वच्छता अभियान नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे, प्रशांत उपाध्ये, रामनाथ जाधव, अरुण थोरात, राजेंद्र शेलार, मनोज लोट, पवन हाडा, रविंद्र दिनकर, रमेश घोरपडे, विजय डाके, अरुण फाजगे, कैलास आढाव, भिवसेन पगारे, सतीष साबळे, कवलजित लोट, जावेद शेख, प्रविण पोटे यांनी केली.  
सरकारने मार्च २०१८ मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, कप, चमचे, प्लेट्स आणि टिफिन कंटेनरसह डिस्पोजेबल प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली होती. वापरकर्ते, किरकोळ विक्रेते आणि प्लास्टिकची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर, साधारण एक वर्षानंतर ही मोहीम मंदावली आणि सिंगल यूज प्लास्टिक बाजारात उपलब्ध होऊ लागले. कोविड-19 (Covid-19) महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान ही मोहीम तात्पुरती बंद करण्यात आली होती.

Leave a Reply

You cannot copy content of this page