समताच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध विक्रम- सौ.स्वाती कोयटे

समताच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध विक्रम- सौ.स्वाती कोयटे

Various records of Samata students at national and international level- Mrs. Swati Koyte

राष्ट्रीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत समता स्कुलला ५५ पदकेSamata School won 55 medals in National Coloring and Handwriting Competition

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat26 Nov , 11.00 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : समता इंटरनॅशनल स्कूलच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध प्रकारच्या मैदानी खेळात व स्पर्धेत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सन रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेच्या २०२२-२३ च्या राष्ट्रीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेत घवघवीत यश मिळवित एकूण ५५ पदकं पटकावून वर्चस्व स्थापित केले असल्याचे गौरवउद्गार समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे हाच आमचा उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या,

सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या, समता पॅटर्नद्वारा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे हाच आमचा उद्देश आहे. विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया अनेक नवनवीन रेकॉर्ड तयार करत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिकते बरोबरच मानसिक व शारीरिकतेलाही आम्ही विशेष महत्त्व देत आहोत. विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थी सुदृढ बनवण्याचा आमचा विशेष प्रयत्न असतो.

समता इंटरनॅशनल च्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील इ.१ ली ते इ.१० वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रंगभरण आणि हस्ताक्षर प्रकारात सुवर्ण, कास्य, रजत अशी ५५ पदके मिळविली. रंगभरण स्पर्धेत २८ आणि हस्ताक्षर स्पर्धेत २७ पदकांचा समावेश आहे. आर्ट मेरिट मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि आकर्षक बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कला विभागाच्या प्रमुख विभावरी नगरकर आणि कला शिक्षक – शिक्षिका यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

समता इंटरनॅशनलचे संस्थापक काका कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे, उपप्राचार्य समीर अत्तार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page