उध्दव ठाकरेंची शिवसेना तालुक्यातील २६ग्रामपंचायती निवडणुका ताकदीने लढणार : प्रमोद लबडे        

उध्दव ठाकरेंची शिवसेना तालुक्यातील २६ग्रामपंचायती निवडणुका ताकदीने लढणार : प्रमोद लबडे

     Uddhav Thackeray’s Shiv Sena will contest 26 gram panchayat elections in taluka with strength: Pramod Labade

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun27 Nov , 21.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.  या सर्व निवडणुका ‘ उद्धव  ठाकरेंची  शिवसेना’ पूर्ण ताकदीने लढविणार आहे, असे प्रतिपादन कोपरगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे  यांनी केले.

शिवसेनेच्या खर्डे कॉम्प्लेक्स  कार्यालयात लबडे  यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात स्थानिक उपतालुकाप्रमुख गट गण प्रमुख कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील आगामी सर्वच ग्रामपंचायत निवडणुका  ताकदीनिशी लढवून उद्धव ठाकरेंची शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरेल, अशा पद्धतीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
लबडे म्हणाले म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या आदेशाने  पदाधिकार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागणे गरजेचे आहे. प्राथमिक स्वरूपात शिवसेनेचा संपर्क असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चाचपणी करावी. अशा गावातील इच्छुक उमेदवारांशी संपर्क करावा. इच्छुक उमेदवारांच्या सामाजिक व विकासात्मक कामाचा आढावा घ्यावा. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद लोकनियुक्त असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारांवरही लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना लबडे  यांनी केल्या. 
यावेळी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे  
म्हणाले,खर्डे कॉम्प्लेक्स येथे ऑनलाइन फॉर्म भरणे व इतर अडचणी सोडवण्याकरिता स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात गट तटामुळे विकास कामांना अडथळे येत असून ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक होण्यासाठी सदस्य व सरपंच म्हणून चांगल्या उमेदवाराची आवश्यकता आहे. अजूनही पाणी, रस्ते, वीज, सामान्य कुटुंबाच्या अडचणी केंद्र व राज्य शासनाच्या योजना थेट ग्रामपंचायतच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीला सक्षम व अभ्यासू सदस्य व सरपंचाची आवश्यकता आहे त्यामुळे गाव पातळीवर चांगले उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीत उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका सर्वांनी मांडली. या बैठकीत भाऊसाहेब शेळके ,कृष्णा अहिरे, अशोक कानडे, राहुल होन, विजय गोरडे, लक्ष्मण पुरी, बाळासाहेब मापारी, भाऊसाहेब मंचरे, रमेश वाकचौरे, अतुल सवत्सरकर, अशोक मुरडणर, राजेंद्र नाजगड, मच्छिंद्र नवले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page