कोपरगाव जुगार अड्ड्यावर छापा; १५ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख १५ हजाराचा मुद्येमाल जप्त.
Raid on Kopargaon gambling den; A case has been registered against 15 people, and valuables worth 1 lakh thousand have been seized.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat26 Nov , 16.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोपरगाव शहर पोलिसांनी छापा टाकून १५ जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतला असता त्यांच्याकडून १० हजार ५०० रूपयाची रोकड ३०,०००/- रु कि ची हिरो स्पप्लेंडर मोटार सायकल विना नंबरची जु वा कि अ , ३०,०००/- रु कि ची हिरो होंडा स्प्लेडंर एम एच १७ ए. के. ७४०२ नंबरची जु वा कि अ. २०,००० /- रु कि ची बजाज कपंनीची मो.सा.एम एच १५ पी ४४९६ नंबरची जु वा कि अ. २५०००/-₹ कि ची विना नंबरची हिरो होंडा स्पप्लेंडर मोटार सायकल जु.वा कि अशी चार दुचाकी एक लाख ५ हजार रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटी स्टँड जवळील पत्र्याच्या खोलीत काही इसम पैशावर खेळला जाणारा पत्त्याचा हार जीतीचा जुगार खेळतात अशी गुप्त बातमीदारामार्फत माहीती शुक्रवारी(२५) रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना मिळाली होती. यावेळी पथकाने दुपारी चार साडेचार वाजता छापा टाकत १५ जणांना ताब्यात घेत.पो कॉ/ २०७ विलास लाला मासाळ नेमणुक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन वरील सर्व आरोपीता विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गु.रजि नंबर ४०० / २०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा क १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
इसुफ अब्दुल पठान वय ४१ वर्षे रा. चांदेकसारे, ता कोपरगाव, रविंद्र राजु साठे वय ३४ वर्षे बाजारतळ, कोपरगाव ता. कोपरगाव शाम विलास जाधव वय ३० वर्षे रा. गांधीनगर कोपरगाव, नय्युम सत्तार मनियार वय २२ वर्षे रा. मुर्शतपुर ता. कोपरगाव, अभिशेख चंद्रकांत राठी वय ३३ वर्षे रा. इंदिरापथ गोकुळनगरी, ता कोपरगाव, अलताफ रशिद शेख वय ३२ वर्षे रा. चांदेकसारे ता. कोपरगाव, शुभम केशव राकपसरे वय २२ वर्षे रा. कोर्टरोड, कोपरगाव,
सोमनाथ कचरु पोटे वय २६ वर्षे रा. रामवाडी, संवत्सर ता कोपरगाव,तुषार दिलीप सातपुते वय २९ वर्षे रा. वैजापुर जि. औरंगाबादअजिज मोहमद पठान वय ४२ वर्षे रा. टाकळी ता कोपरगाव, नासीर लतिफ शेख वय ३२ वर्षे रा. गांधीनगर कोपरगाव, आंनद श्रावण दिलपाक वय ४१ वर्षे रा.जानकीविश्व, कोपरगाव, डिंगबर बबनराव डावरे वय ३४ वर्षे रा.खडकी ता. कोपरगाव, गोविंद राजु शेलार वय ३२ वर्षे रा. निवारा कोपरगाव, राजेंद्र रघुनाथ डगळे वय ३३ वर्षे रा. गांधीनगर, कोपरगाव या आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला सो. अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक,श्रीमती स्वाती भोर , श्रीरामपुर विभाग,उपविभागीय पोलीस अधीकारी संजय सातव. शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली, पो. नि. वासुदेव देसले, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन,पोहेकॉ/ डी आर तिकाणे. कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने ही कारवाई केली.