धामोरी उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या श्रीमती अमिना शेख
Mrs. Amina Shaikh of Dhamori Upsarpanchpadi Kolhe group
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon28 Nov , 19.20 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या श्रीमती अमिना शेख यांची सरपंच जयश्री नारायण भाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक एफ. एन. तडवी यांनी काम पाहिले. या निवडीबददल भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री प्रभाकर मांजरे, शिवाजीराव वाघ, चंद्रशेखर माळी, द्वारकाबाई बाबासाहेब वाणी, बाबासाहेब गांगुर्डे, बबनराव भाकरे, श्यामसुंदर पवार, श्रीमती स्वाती किशोर आढाव, योगिता ढोमसे उपस्थित होते.
या निवडीसाठी सर्वश्री. अशोकराव भाकरे, कैलास माळी, प्रकाश वाघ, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विलासराव माळी. राहुल वाणी, रोहिदास साळुंके, विलास भाकरे, बाळासाहेब अहिरे, सुनिल वाणी आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
नवनिर्वाचित उपसरपंच अमिना शेख व माजी उपसरपंच चंद्रशेखर माळी यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना अमिना शेख म्हणाल्या की, धामोरी गांवच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेवुन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय निमशासकीय योजनांच्या परिपुर्ण अंमलबजावणी प्रयत्न करू. व्यक्तीगत लाभाच्या ज्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत देण्यांसाठी परिश्रम घेवु. या निवडीबद्दल भाजपचे तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले आदींनी उपसरपंच अमीना शेख यांचे अभिनंदन केले आहे