कोपरगावात ग्रामपंचायत निवडणुक सरपंच पदासाठी ५ अर्ज, तर सदस्यांसाठी १६ अर्ज दाखल

कोपरगावात ग्रामपंचायत निवडणुक सरपंच पदासाठी ५ अर्ज, तर सदस्यांसाठी १६ अर्ज दाखल

In Kopargaon Gram Panchayat Election 5 applications for the post of Sarpanch and 16 applications for members

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue29 Nov , 16.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : कोपरगाव तालुक्यात  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून (२८ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील २६  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. २ डिसेंबर अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. १८ डिसेंबरला मतदान झाल्यानंतर मतमोजणी २० डिसेंबर २०२२ ला होणार आहे.

दुसऱ्या दिवशी (२९ नोव्हेंबर) रोजी कोळपेवाडी १, डाऊच खुर्द १,सोनेवाडी २, बहादरपुर १, असे सरपंच पदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर २६ ग्रामपंचायत सदस्य पदासाठी कोळपेवाडी ८, सोनेवाडी ७, वेस सोयगाव १,असे सदस्य पदासाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती निवडणूक शाखा अधिकारी शिरसाट यांनी दिली आहे. 
कोपरगाव तालुक्यातील भोजडे,सडे, शिंगणापूर,  वेस-सोयगाव,कोळपेवाडी, वडगाव, मोर्विस, खिर्डी गणेश, पढेगाव, चासनळी, माहेगाव देशमुख, रांजणगाव देशमुख, शहापूर, बहादराबाद, डाऊच बु., डाऊच खु., देर्डे-को-हाळे, तळेगाव मळे, चांदेकसारे धारणगाव, हंडेवाडी, बत्तरपूर, सोनेवाडी,खोपडी, करंजी बु, बहादरपूर या २६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 
विजय बोरुडे, तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी,यांनी निवडणुकांची १८ नोव्हेंबरला  नोटीस प्रसिद्ध केली आहे.
 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व  त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या  वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर, २०२२ ला होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page