कोपरगाव तालुक्यात कंटनेर-दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
One killed, one injured in a container-two-wheeler accident in Kopargaon taluka
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 3 Dec22 , 18.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मुबंई नागपूर महामार्गावर तालुक्यातील तळेगाव मळे शिवारात कंटेनरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने या कंटेनर दुचाकी अपघातात एक जण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मुबंई नागपूर महामार्गावर तळेगाव मळे शिवारात कंटेनर व दुचाकी अपघातात एक जण ठार झाला. ही घटना शुक्रवारी (२ डिसेंबर) दुपारी दोनच्या दरम्यान घडली.
वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक एम. एच.४० बीजी ०५४५ ने मोटारसायकल क्रमांक एम. एच.१७ सीएफ. ०६१४ या दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने त्यात दुचाकीवरील वैजापूर तालुक्यातील मुनिर नजीर इनामदार (५३) हे जागीच ठार झाले.या भीषण अपघातात त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे सर्वत्र विखुरले होते. तर त्यांच्या सोबत असलेले अशोक तबाजी दिवे हे गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार मयत मुनिर नजीर इनामदार हे त्यांच्या पत्नीस भेटण्यासाठी मित्रासोबत धोत्रे गावी आले होते. त्यांचे दुचाकीचे चाक पंचर झाले होते त्यांच्या दुचाकीचे पंचर झालेले चाक दुसऱ्याच्या दुचाकीवरून पंचर काढण्यासाठी घेऊन जात असताना तळेगाव मळे येथे हा भीषण अपघात घडला.
कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून कंटेनरच्या फरार झालेल्या चालकाविरुद्ध भादवी कलम ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहे.
Post Views:
362





