बिपीनदादा कोल्हे यांना साखर उद्योगातील  देशपातळीवरील जीवन गौरव पुरस्कार

बिपीनदादा कोल्हे यांना साखर उद्योगातील  देशपातळीवरील जीवन गौरव पुरस्कार

Bipindada Kolhe National Level Jeevan Gaurav Award in Sugar Industry

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 4 Dec22 , 16.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल देशपातळीवर कार्यरत असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीटयूट कोईमतूर अंतर्गत सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीट्युट संस्थेचे माजी संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.विजयन नायर यांच्या हस्ते देऊन सन्मान केला आहे. सदरचा पुरस्कार बिपिनदादा कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतकऱ्यांच्या चरणी समर्पित केला आहे.

           या संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, पुढच्या वर्षापासून सहकारी साखर उद्योगात माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या नावे प्रतिष्ठेचा देश पातळीवर पुरस्कार या संस्थेचेवतीने दिला जाणार आहे.
          सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादनांबरोबरच आसवनी त्यावरील विविध रासायनीक उपपदार्थांची निर्मीती करून सहवीज निर्मीती, बायोगॅस, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करून देशपातळीवर नावलौकीक मिळविला आहे.
            माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिपीनदादा कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याबाबत धडक कृती विकास कार्यक्रम राबविले. उस संशोधनातील शिखर संस्था असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट सोसायटी कोईमतूर अंतर्गत उसाच्या विविध विकसीत जातीचे उस बेणे सभासदांसह शेतकऱ्यांना उपलब्ध करून कमी पाण्यांत, कमी श्रमात अधिक उस उत्पादन कसे मिळेल यावर सातत्यांने भर दिला आहे. 
            सत्कारास उत्तर देतांना श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, सध्या उस उतारा आधारीत दर दिले जात असल्याने प्रती हेक्टरी उस व साखर उतारा देणाऱ्या उस जातींची गरज आहे आणि त्यासाठी उस संशोधन केंद्र कोईमतूर संस्थेने को ७२१९, को ८६०३२ सारख्या उस जाती विकसीत करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जगात ब्राझील मध्ये १५ टक्के साखर उतारा देणाऱ्या उस जाती विकसीत झाल्या आहे, त्या भारतात विकसीत झाल्या तर साखर उद्योगाचे भवितव्य अधिक उज्वल होईल. ऊस संशोधनात कोईमतुर संस्थेने मोठ्या प्रमाणात सहकार्य देऊन शेतकऱ्यांचे प्रति हेक्‍टरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी मौलिक मार्गदर्शन केले आहे. साखर उद्योगातील भरीव योगदान बद्दल शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोईमतुर यांनी आपला जो सन्मान केला आहे तो व्यक्तिगत माझा नसून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा असल्याचे ते म्हणाले. या पुरस्काराबद्दल बिपिनदादा कोल्हे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page