संजीवनी पाॅलीटेक्निक : व्हाॅलीबाॅल संघ विभागीय स्पर्धेत प्रथम, आता लक्ष राज्य स्पर्धेवर

संजीवनी पाॅलीटेक्निक : व्हाॅलीबाॅल संघ विभागीय स्पर्धेत प्रथम, आता लक्ष राज्य स्पर्धेवर

Sanjeevani Polytechnic: Volleyball team first in the regional tournament, now focus on the state tournament

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 6 Dec22 , 14.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव: इंटर इंजिनिअरींग स्टूंडटस् स्पोर्टस् असोसिएशन, महाराष्ट्र राज्य प्रायोजीत व संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत ई १ झोन अंतर्गत मुलांच्या  व्हाॅलीबाॅल संघाने बेलवंडी येथिल इंदिरा गांधी पाॅलीटेक्निक या प्रतिस्पर्धी संघाविरूध्द लढत देत बेस्ट ऑफ  थ्री च्या दोन सेट मध्येच २५-१३ व २५-१७ अशा  गुणांनी सामना जिंकत विभागीय पातळीवर दणदणीत  विजय मिळविला.

आता संजीवनीच्या संघाने अमरावती येथे गव्हर्नमेंट पाॅलीटेक्निक मध्ये घेण्यात येणाऱ्या  राज्यस्तरीय व्हाॅलीबाॅल सामान्यंमध्ये सुध्दा प्रथम क्रमांक मिळविण्याचा चंग बांधला आहे, अशी  माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी पाॅलीटेक्निकच्या व्हाॅलीबाॅल संघाने यापुर्वीही अनेकदा विभागीय तसेच राज्य पातळीवर यश  संपादन केले आहे. यावेळी राज्यात सुमारे ८०० संस्थांमधुन प्रथम क्रमांक मिळविण्याच्या जिध्दीने खेळाडू सराव करीत आहे. विभागीय सामन्यांसाठी ई १ झोन मधिल एकुण १५ संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामन्यासह इतर सामन्यांमध्ये कर्णधार यश  गजेंद्र साबळे याच्या नेतृत्वाखाली अर्पित लाझरस गायकवाड, प्रथम चंद्रशेखर गाडे, कुणाल जयराम पवार, सोहम युवराज येशी , कृष्णा  विकास कड, गोपाळ पद्मसिंग भुंजे, आदित्य संजय भांगे, ओम संजय राजगुरू, एम.डी. लारायब अलम, साई बापुसाहेब नवले व आर्यन देविदास दुसाणे यांनी उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  केले. या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. शिवराज  पाळणे व प्रा. गणेश  नरोडे यांचे मार्गदर्शन  लाभले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धासांठी शुभेच्छा दिल्या. तसेच  अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कारही केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख प्रा. गणेश  जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. मोहिनी गुंजाळ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page