पी.एम. यशस्वी’ शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक देशात प्रथम

पी.एम. यशस्वी’ शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक देशात प्रथम

P.M. Yashasva’ Atma Malik first in the country in the scholarship examination

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 5 Dec22 , 18.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने आयोजित PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India अर्थात ‘पी.एम. यशस्वी’ शिष्यवृत्ती योजना या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या विद्यालयाचे ३७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय टेस्टींग एजन्सी (NTA) मार्फत ‘यशस्वी’ शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते.

संपूर्ण देशात एका शाळेतील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र होण्याचा मान आत्मा मालिकने मिळविला आहे. ही परीक्षा इयत्ता ९ वी व ११ वी या वर्गासाठी घेतला जातो. गुणवत्ता यादीत येणाया इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दोन वर्षासाठी मिळते. आत्मा मालिक च्या इ. ९ वी च्या ३७ विद्यार्थ्यांना दोन वर्षात ५५ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाविण्याचा बहूमान पटकविला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून आत्मा मालिक शैक्षणिक संकूल व अथर्व फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विदयमाने इ. ७ वी पासून विदयार्थ्यांची फांउडेशन वर्गाच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती परीक्षाची तयारी करून घेली जाते. अभ्यास क्रमाचे योग्य नियोजन, अनुभवी प्रशिक्षित शिक्षक नियमित सराव यामुळे एवढे मोठे यश प्राप्त झाल्याचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, फांऊडेशन विभाग प्रमुख सचिन डांगे, अथर्व फांऊडेशनचे संचालक नंदकुमार भाटे, डॉं. राहुल मिश्रा, क्षितीज मिश्रा, शिवम तिवारी, वर्गशिक्षक राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच आत्मा मालिक ध्यानपीठाचे प.पु. आत्मा मालिक माऊली व संत मांदियाळी तसेच अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page