कोरोनानंतर आरोग्य सेवा प्रचंड महाग झाल्या – डॉ. महेश क्षीरसागर

कोरोनानंतर आरोग्य सेवा प्रचंड महाग झाल्या – डॉ. महेश क्षीरसागर

Health services became very expensive after Corona – Dr. Mahesh Kshirsagar

हॉस्पिटल कार्पोरेट झाल्याने  टार्गेट अचिव करण्याची प्रवृत्ती बळावलीAs the hospital became corporatized, the tendency to achieve the target became stronger

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 8 Dec22 , 15.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आरोग्य सेवेबाबत आजही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात  अज्ञान आहे शिवसेनेची आता ‘शिव आरोग्य सेवा’ या मार्फत ग्रामीण भागात  आरोग्य सेवेविषयी  जनजागृती करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आरोग्यसुविधा पुरविणारी ‘शिव आरोग्य’ सेवा राबविणार असल्याचा मनोदय उत्तर महाराष्ट्र  शिव आरोग्य सेना राज्य अध्यक्ष डॉ. महेश क्षीरसागर यांनी कोपरगाव येथे गुरुवारी (८) रोजी सकाळी शिवालय येथील सत्कार समारंभात  व्यक्त केला.तर  कोरोना नंतर आरोग्य सेवा प्रचंड महाग झाल्या असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे कलविंदर दडियाल, इरफान शेख, राहुल देशपांडे, विशाल झावरे, बाळू साळुंखे, शेखर कोलते आदी पदाधिकारी हजर होते.
डॉ. क्षीरसागर पुढे म्हणाले,शिवसेनेतर्फे आरोग्यविषयक सेवांकरिता केवळ शिव आरोग्य सेना अंगीकृत संघटना म्हणून कार्यरत आहे.मला केवळ राजकारण करायचे नसूनसमाजकारण करून जनतेची सेवा करायची आहे.८० टक्के समाजकारण करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. निरोगी व सुदृढ महाराष्ट्र व्हावा,यासाठी  अधिक प्रभावीपणे ती राबविण्यासाठी सरकारी योजना व  सरकारी यंत्रणांचा वापर योग्य प्रकारे होत आहे की नाही?  यंत्रणा कार्यरत आहे की नाही? सरकारी दवाखान्यात कर्मचारी उपस्थित आहे किंवा नाही ? रुग्णांना व्यवस्थित सेवा मिळते किंवा नाही  दोनशे रुपयांच्या विमा मिळतो की नाही ? शासकीय योजनां पूर्णपणे वापरले जाते की नाही? यावर आपण नजर ठेवणार आहोत अनेक ठिकाणी सरकारी योजनांची माहिती  सर्वसामान्य नागरिकांना  दिली जात नाही. असेही ते म्हणाले,
डॉ.क्षीरसागर म्हणाले, आज हॉस्पिटल कार्पोरेट झाले आहेत रोजचे टार्गेट अचिव करण्याची प्रवृत्ती बळावली आहे. त्यामुळे गरज नसतानाही शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वसामान्य लोकांना अजूनही आरोग्य सेवा मिळालेल्याच नाहीत हा मोठा प्रश्न आहे. शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिक यांना वनस्पतीच्या माध्यमातून घरगुती उपायांचे महत्त्व पटवून देणार आहोत  नैसर्गिक उपचार पद्धतीचे मार्गदर्शन करणार आहे व्यसनाची वाढते प्रमाण  आरोग्यावरील खर्च कमी करून आरोग्य  राखणे यावर  जनजागृती करणार यासह विविध आरोग्य योजनांचे माहिती व मार्गदर्शन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे व मी केवळ बोलत नाही, आयुर्वेद उपचार पद्धती व योगा याबाबत सर्वसामान्य नागरिकांना प्रबोधन  करण्यावर भर देणार आहे रुग्णांना परवडतील अशा किमतीत औषधे देण्यासाठी जेनरिक औषधांनाही प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ.क्षीरसागर म्हणाले,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली  शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून गोरगरीब-गरजूंना वैद्यकीय मदतीसह आर्थिक मदतही करण्यात येणार आहे. यासाठी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून शेकडो डॉक्टर, शासकीय डॉक्टर   मेडिकल कर्मचारी, आरोग्य सेविका, मेडिकल रिप्रेझेंटिव्ह, ॲम्बुलन्स चालक वाहक यांना शिवसैनिक जोडणार  त्यांना गरजवंतांसाठी काम करण्याची संधी देणार आहे. आगामी काळात शिव आरोग्य सेनेच्या कार्याची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार आहे. यासाठी नव्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्याही केल्या जाणार संकेतही त्यांनी  दिले .  यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयावर डॉ. महेश शिरसागर यांच्याशी  चर्चा करण्यात आली.

चौकट:

कोरोना नंतर आरोग्य सेवा प्रचंड महाग झाली पूर्वी दवाखान्यासाठी वीस पंचवीस हजार खूप होत होते. परंतु आज दोन ते  तीन लाख रुपये बिलं कॉमन झाला आहे. कोरोना काळात २० ते २५ लाखापर्यंत   बिलं झालीत तरीही माणसे हाती लागली नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. अनेक अशी औषधे  आहेत की जी आपण  खायलाच नकोत ती खाल्ल्यामुळे  कॅन्सर होतो. आपली जी भारतीय पद्धती आहे ती हळूहळू आपल्याला जपावी लागणार आहे. आपल्याला हळूहळू आपल्या आयुर्वेदाकडे वळावे लागणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page