कोपरगाव २६ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच ८५ तर ५६९ सदस्य उमेदवार रिंगणात ;   ७४ सरपंच  तर २९१ सदस्यांची माघारी 

कोपरगाव २६ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच ८५ तर ५६९ सदस्य उमेदवार रिंगणात ;   ७४ सरपंच  तर २९१ सदस्यांची माघारी 

In the Kopargaon 26 Gram Panchayat elections, Sarpanch 85 and 569 members are in the fray; 74 Sarpanchs and 291 members withdrew

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 8 Dec22 , 18.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यात होणाऱ्या २६  ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्ज छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आहे.  सोमवारी छाननी मध्ये १४ सदस्यांचे अर्ज बाद झाले होते.तर  बुधवारी माघारी असल्याने ७४ सरपंच  तर २९१ सदस्यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने ६५४ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उभे आहेत.  त्यामुळे ८५ सरपंच व ५६९ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. 

रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.
सरपंचपदासाठी तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुक निर्धारित कालावधीमध्ये सदस्यांच्या २४८ जागांसाठी तब्बल ८८२ अर्ज दाखल झाले होते, तर थेट सरपंचांसाठीच्या २६ जागांसाठी तब्बल १५९ उमेदवारी अर्ज दाखल  करण्यात आले होते.  त्यापैकी छाननीत सरपंचपदासाठी एकही अर्ज अवैध झाला नाही त्यामुळे सरपंच पदासाठी १५९ अर्ज वैध ठरविण्यात आले होते. तर   सदस्य साठीच्या  आलेल्या  ८८२ उमेदवारी अर्ज पैकी   १४ अर्ज अवैध झाल्याने  ८६८ अर्ज वैध ठरवण्यात आले. त्यानंतर माघार घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत सरपंचपदासाठी ७४  जणांनी आपले नाम निर्देशन पत्र मागे घेतले    तर २९१  सदस्यांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यामुळे सद्य:स्थितीत थेट सरपंच निवडणुकीसाठी ८५  तर सदस्यांसाठी ५६९ उमेदवार रिंगणात आहेत. 
२६ ग्रामपंचायत निहाय निवडणूक रिंगणात  असलेले उमेदवार  सदस्य संख्या व कंसात सरपंच संख्या दिली आहे .
 भोजडे १८  (२) ,   सडे १४ (२),   शिंगणापूर ३५ (२),   वेस सोयेगांव २५ (३) ,   कोळपेवाडी २९ (३),   वडगाव २१ (३) , मोर्विस १२ (३),   खिर्डी गणेश २७ (६),  पढेगाव २८ (५), चासनळी ३३ (६), माहेगाव देशमुख २७(३), रांजणगाव देशमुख २२ (२), शहापूर १४ (३), बहादराबाद १५ (२), डाऊच बु.१४ (३)  डाऊच खु ३४ (४), देडे कोऱ्हाळे १९ (२)  तळेगाव मळे १८ (३), चांदेकसारे २७ (४), धारणगाव २२ (४),   हंडेवाडी १२ (३),  बक्तरपूर १४ (२), सोनेवाडी २७ (३), खोपड़ी ११ (४),  करंजी बु.३२ (३),  बहादरपूर १९ (२) असे २४८ सदस्यासाठी ५६९ अर्ज तर २६ सरपंच पदासाठी ८५  उमेदवार रिंगणात असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्यातील राजकीय परिस्थिती बघता आता ग्रामपंचायतमध्येसुद्धा चुरशीची लढत होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page