श्री साई बाबांच्या सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी”   मसुदा दारूवाला हिचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसाठी नवा विश्वविक्रम 

श्री साई बाबांच्या सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी”   मसुदा दारूवाला हिचा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसाठी नवा विश्वविक्रम 

Shree Sai Baba’s Smallest Portrait Rangoli” New World Record by Masuda Daruwala for International Book of Records

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 9 Dec22 , 19.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव (महाराष्ट्र) येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या  मसुदा मोहम्मद साहेब दारूवाला या “एका व्यक्तीने बनवलेल्या  श्री साईबाबांचे सर्वात लहान  रांगोळी पोर्ट्रेट बनवून  इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसाठी नवा विश्वविक्रम प्रस्थापित करून आपल्या नांवाची नोंद  केली आहे.

मसुदा मोहम्मद साहेब दारूवाला, कोपरगाव (महाराष्ट्र) हिने १० नोव्हेंबर २०२२ रोजी  श्री साईबाबांची सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी ( २ सेमी. x २.५ सेमी.) तयार केली. यापूर्वी  ५  सेंमी x ५  सेंमी. असा सर्वात लहान रांगोळी पोट्रेट नोंदविण्याचा विक्रम होता.  ( २ सेमी. x २.५ सेमी.) सर्वात लहान रांगोळी पोट्रेट काढून मसुदाने तू विक्रम मोडीत काढून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
या पद्धतीने इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि किंग्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स करणारी मसुदा दारूवाला ही संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
तिचे वडील दारूवाला पेंटर या नावाने कोपरगाव मध्ये प्रसिद्ध आहेत  त्याचप्रमाणे तिचा भाऊ मतीन दारूवाला हा संजीवनी अकॅडमी मध्ये  कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
गेल्या एक वर्षापासून मसुदा दारूवाला ही पोट्रेट रांगोळीचा सराव करत  होती यापूर्वीही तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर रांगोळी स्पर्धेचे हॅट्रिक केली आहे  अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन तिने वेगवेगळे पुरस्कार व बक्षिसे मिळवली आहेत. पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक संघ यांच्या राष्ट्रीय पातळीवरील रांगोळी स्पर्धेत सलग तीन वर्ष तिने पुरस्कार मिळून हॅट्रिक केली आहे. काल तिने श्री साईबाबांचे सर्वात लहान रांगोळी पोट्रेट काढले याबद्दल २० ठिकाणी तिच्या विक्रमाची नोंद झालेली आहे परंतु सध्या तिला इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि किंग्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स ही तीन सर्टिफिकेट प्राप्त झाले असून इतर सर्टिफिकेट येण्याची प्रतीक्षा आहे.
उपरोक्त यशाबद्दल संजीवनी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ.मनाली कोल्हे यांनी कलाशिक्षक मसुदा दारूवाला हिचे अभिनंदन केले. नव्या विक्रमा बद्दल मसुदा हिचे  सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page