आ.आशुतोष काळेंची विकासकामे जनमाणसांपर्यंत पोहचले पाहिजे- संदीप वर्पे

आ.आशुतोष काळेंची विकासकामे जनमाणसांपर्यंत पोहचले पाहिजे- संदीप वर्पे

A. Ashutosh Kale’s development work should reach the people – Sandeep Varpe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon12 Dec22 , 19.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव: आ.आशुतोष काळे केलेली विकासकामे जनमाणसांपर्यंत पोहचले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या वाढदिवशी  आयोजित व्हर्च्युअल रॅली कार्यक्रमात केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा देशाचे माजी कृषी, संरक्षणमंत्री पद्मविभूषण खा. शरद पवार यांनी देशाचे कृषी मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राबविलेल्या अनेक योजनांमुळे शेतकरी अर्थसंपन्न होऊन आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन अन्नधान्य निर्यात करू लागला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी पवार  केलेले डोंगराएवढं काम आहे.

 श्री वर्पे पुढे म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटी निधी आणून केलेली विकासकामे बिगर राजकीय नागरिकांपर्यंत पोहचविल्यास आपण प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना मात देऊ.पवार साहेबांनी आ.आशुतोष काळे यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली असून त्यांना कायम राज्य पातळीवर मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अविरतपणे काम करावे. नेत्यांचे वाढदिवस हे प्रेरणा घेण्यासाठी असतात. वय वर्षे ८२ असतांना देखील पवार साहेब सातत्याने पक्षासाठी काम करीत आहे. आपण देखील यापुढे त्यांचा आदर्श घेऊन आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघात केलेली कोट्यावधी रुपयांची विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी म्हणाले की, पवार साहेबांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्र घडविला, वाढविला व देशाच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत असतांना दिन-दलित, गरीब, शेतकरी, कष्टकरी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या  अडचणी, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकार, राजकीय आदी क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान असून त्यांच्या मार्गदर्शनाची देशाला व राज्याला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, महिला शहराध्यक्ष सौ.प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्ष सौ. वैशाली साबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, दिनार कुदळे, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

Leave a Reply

You cannot copy content of this page