रस्ते, शाळा व इतर कामांसाठी कोट्यवधींचा निधी – आ. आशुतोष काळे यांची ग्वाही

रस्ते, शाळा व इतर कामांसाठी कोट्यवधींचा निधी – आ. आशुतोष काळे यांची ग्वाही

Funds worth crores for roads, schools and other works – Assertion of MLA Ashutosh Kale

मढी बुद्रुक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 5 Thu.16.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव:कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे विविध विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले.

गावात १ कोटी ३० लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. तसेच ४० लाख रुपये निधीतून राज्य मार्ग ७ ग्रामा ३० चारी क्रमांक ७ रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन झाले. या आरोग्य उपकेंद्रामुळे मढी खुर्द, मढी बुद्रुक व परिसरातील नागरिकांना लसीकरण, माता-बाल संगोपन व प्राथमिक उपचारांच्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हे केंद्र ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत नेणे सोपे होणार असून विद्यार्थ्यांनाही प्रवास सुलभ होईल. रस्ता पूर्ण होण्यापूर्वी पाणी पाइपलाइनची कामे करून घ्यावीत, अन्यथा नंतर रस्ता खोदण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही आमदारांनी स्पष्ट केले.

याशिवाय जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांसाठी ३६ लाख रुपये, मढी खुर्द फाटा ते उंबरी नाला रस्त्यासाठी ३६ लाख, गावातील सिमेंट रस्त्यांसाठी २० लाख, विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी २० लाख, तलाठी कार्यालयासाठी २७ लाख, व्यायामशाळेसाठी ७ लाख तसेच कब्रस्थान संरक्षण भिंतीसाठी ७ लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page