पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या – आ.आशुतोष काळे
Give incentives to farmers who pay crop loans – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue13 Dec22 , 17.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव – आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियमित कर्जफेड करणारे अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदान तातडीने जमा करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक चिंता दूर झाल्या आहेत. परंतु जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करीत होते त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनेचा फायदा व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून कोपरगाव तालुक्यातील ६५०० शेतकऱ्यांपैकी ७४६ शेतकऱ्यांना या ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. परंतु अजूनही हजारो शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम तातडीने मिळावी
तसेच मागील दोन वर्षात काळात ७१ कर्जदार शेतकरी मृत्यु पावले आहेत परंतु त्या मृत्यु झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या वारसांना प्राधान्याने हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांचे अर्ज भरणे बाकी आहेत त्या शेतकऱ्यांनी कोळपेवाडी व कोपरगाव येथील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रोत्साहनपर अनुदान मागणी अर्ज भरून द्यावेत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.