३० लाखांच्या रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर ; राष्ट्रवादीच्या मागणीची पालिकेकडून दखल

३० लाखांच्या रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर ; राष्ट्रवादीच्या मागणीची पालिकेकडून दखल

30 lakh road budget submitted; The municipality took note of the demand of NCP

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed14 Dec22 , 17.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नगरपरिषदेने पूनम थिएटर परिसर ते मेन रोड (बस स्टॅन्ड मार्ग) रस्ता, आशा रेस्टॉरंट ते जुना कोठारी दवाखाना व व्यापारी धर्मशाळा समोर रस्ता या तीनही रस्त्यांच्या  २९ लाख ९५ हजार ६७७  रुपयांचे अंदाजपत्रक  सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केले आहे.  ही आमच्या  मागणीची दखल असल्याचा दावा कोपरगाव शहर राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक ०३ मधील पुनम थिएटर परिसर ते बस स्टॅन्ड रस्ता तसेच अशा रेस्टॉरंट ते जुना कोठारी दवाखाना व व्यापारी धर्मशाळा समोरील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा त्रास होत होता. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील  गंगुले,  विरेन बोरावके, मंदार पहाडे,  सुनील शिलेदार, रमेश गवळी, मनोज नरोडे, धनंजय कहार, राहुल देवळालीकर, संदीप कपिले यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेऊन या प्रमुख रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावी अशी मागणी केली होती. 
या मागणीची दखल पालिकेने घेतल्याने  नागरिकांनी आ. आशुतोष काळे व  शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page