कोपरगावात मतदानाला नागरिकांचा उत्साह ;   ८१.०८ टक्के मतदान शांततेत

कोपरगावात मतदानाला नागरिकांचा उत्साह ;   ८१.०८ टक्के मतदान शांततेत

Enthusiasm of citizens to vote in Kopargaon; 81.08 percent polling was peaceful

सर्वात जास्त मतदान  टक्केवारी सडे ग्रामपंचायत ९३.३९% तर सगळ्यात कमी मतदान टक्केवारी चांदेकसारे ४९.४६ % The highest voting percentage is Sade Gram Panchayat 93.39% while the lowest voting percentage is Chandeksare 49.46%.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun18 Dec22 , 20.10 Pm By राजेंद्र सालकर
माहेगाव देशमुखच्या मतदान केंद्रावर आमदार आशुतोष काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोपरगाव : कोपरगाव  तालुक्यातील २६ ग्रामपंचतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी (१८)रोजी सकाळी साडेसात वाजता शांततेत मतदानास प्रारंभ झाला. या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले.  या निवडणुकी साठी ९६ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. सुमारे ८१.०८  टक्के मतदारांनी हक्क बजावला आहे.

 सायंकाळी साडेपाच वाजता ९६  मतदान केंद्रावर २२ हजार २७३  महिला व २४ हजार ६०५ पुरुष  व इतर ० अशा ४६ हजार ८७८ नागरिकांनी मतदान केले असून ८१.०८ टक्के  इतके मतदान झाले .

मतदार मोठय़ा संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावल्याने  दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २६ ग्रामपंचायत साठी ९६  मतदान केंद्रावर १९ हजार १७८  महिला व २० हजार ३८६ पुरुष  व इतर ० अशा ३९ हजार ५६४ नागरिकांनी मतदान केले असून ६९.४ टक्के  इतकी होती. 
) भोजडे (एकुन २३२५ मतदान),  झालेले मतदान १८३१ (७८.७५ टक्के)
२)  सडे    (एकुन ११२० मतदान),  झालेले मतदान १०४६( ९३.३९ टक्के)
३) शिंगणापूर  (एकुन ६८४५ मतदान),  झालेले मतदान ४४३०( ६४.७२ टक्के)
 ४) वेस सोयेगांव  (एकुन १८९३ मतदान),  झालेले मतदान १६१३ ( ८५.२१टक्के), ५) कोळपेवाडी  (एकुन ४७५१ मतदान),  झालेले मतदान ३६८० ( ७७०४६ टक्के)
 ६)  वडगाव   (एकुन ११०९ मतदान),  झालेले मतदान ९६८(८७.२९ टक्के)
   ७) मोर्विस   (एकुन ८१४ मतदान),  झालेले मतदान७४८ ( ९१.८९ टक्के)८) खिर्डी गणेश  (एकुन २०६५ मतदान),  झालेले मतदान १७२४ (  ८३.४९ टक्के) ९)  पढेगाव  (एकुन २३१४ मतदान),  झालेले मतदान १९९२ ( ८६.८ टक्के)१०)चासनळी  (एकुन २८०५ मतदान),  झालेले मतदान १९६९ (७०.२ टक्के) ११)माहेगाव देशमुख  (एकुन ३४१९ मतदान),  झालेले मतदान २७३१ ( ७९.८८टक्के)  १२)रांजणगाव देशमुख  (एकुन ३२३० मतदान),  झालेले मतदान २७७९( ८६.४टक्के) १३) शहापूर  (एकुन १०४४ मतदान),  झालेले मतदान ९२७ ( ८८.७९ टक्के)१४)बहादराबाद  (एकुन ९०६ मतदान),   झालेले मतदान ८४१ (९२.८३ टक्के)१५)डाऊच बु. (एकुन ९८४ मतदान),  झालेले मतदान ८७४( ८८.८२टक्के)१६)  डाऊच खु  (एकुन १५०३ मतदान),  झालेले मतदान १३७१ ( ९१.२२ टक्के) १७)देडे कोऱ्हाळे  (एकुन १६९७ मतदान),  झालेले मतदान१४१२ ( ८३.२१टक्के) १८) तळेगाव मळे  (एकुन १२०६ मतदान),  झालेले मतदान १०७२ ( ८८.८९ टक्के)१९)चांदेकसारे  (एकुन ३६०३ मतदान),  झालेले मतदान १७८२ ( ४९.४६ टक्के)२०)धारणगाव  (एकुन २२९० मतदान),  झालेले मतदान१९४७ (८५.२ टक्के) २१) हंडेवाडी  (एकुन ६१२ मतदान),  झालेले मतदान ५६१( ९१.६७ टक्के)
 २२) बक्तरपूर  (एकुन ९१७ मतदान),  झालेले मतदान ७८८(८०.४९ टक्के)२३) सोनेवाडी  (एकुन ३७२२ मतदान),  झालेले मतदान ३१३४ ( ८४.२ टक्के) २४) खोपड़ी  (एकुन १०९३ मतदान),  झालेले मतदान ९९३ ( ९०.८५ टक्के)२५)  करंजी बु. (एकुन ३२१३ मतदान),  झालेले मतदान २६६५ ( ८२.९४ टक्के) २६) बहादरपूर  (एकुन १७६८ मतदान), झालेले मतदान १६५०( ९३.३३टक्के) या २६ ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्य पदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.
या मतदानानंतर २६ सरपंच पदासाठीच्या ८५ तर २४८ ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या ५६९ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले आहे .या सर्व निवडणूक प्रक्रियेवर तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया सर्वत्र  व्यवस्थित पार पाडण्यासाठी व्यवस्था केली होती निवडणूक प्रक्रिये कामी  निवडणूक शाखा अधिकारी राहुल शिरसाठ यांनी त्यांना मदत केली अधिकारी मंगळवारी २० डिसेंबर रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात मत मोजणी होणार आहे.दिव्यांग व वयोवृद्ध मतदार यांची  ने आण करण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली  कायदा सुव्यवस्था बिघडू नये या करीता कोपरगाव तालुका,शहर    पोलिसांचे विशेष पथक मतदान स्थळी तैनात करण्यात आले होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page