विसपुते सराफ पेढीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
Publication of Calendar of Vispute Saraf Pedi
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पणDebut in Silver Jubilee year
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon19 Dec22 , 18.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या विसपुते सराफ यांच्या २०२३ साठीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोमवारी मान्यवर ग्राहकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महानंदा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बापू जाधव यांच्या हस्ते व सेंट्रल बँकेचे माजी मॅनेजर भालचंद्र विभुते यांच्या व उपस्थित ग्राहकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना विसपुते सराफ पेढीचे संचालक दीपक विसपुते म्हणाले, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात नात्याला अनन्य साधारण महत्व आहे. गुरु-शिष्य,पती-पत्नी ,वडील-मुलगा,आईचे प्रेम या नात्यात एक विश्वास आहे. तिच संकल्पना घेत ग्राहकांशी असलेले अतूट नाते आणखी दृढ करत विसपुते सराफच्या पुढील वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मनस्वी आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या
दुसाने प्रसाद यांनी प्रास्ताविक केले. .
विसपुते पुढे म्हणाले, पेढी चालू वर्षी आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.त्यातून “नात्यांचा रौप्य महोत्सव” हि संकल्पना पुढे आली. सोन्याशी शुद्धता, पारदर्शक व्यवहार व ग्राहकांच्या सेवेला प्राधान्य हे ब्रीद अखेरपर्यंत जोपासणार आहोतच. प्रत्येक महिन्याची दिनदर्शिका अतिशय अर्थपूर्ण केली असून शुद्ध नात्यातून ग्राहकांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करण्यास पेढी प्राधान्य देत आहोत.त्यातून आईचे प्रेम,पती-पत्नी मधील विश्वास ,भावाचा बहिणीला आधार,बाप लेकीचा सहवास,नातवांसमवेत आजीची गोष्ट ,मैत्रिणीची साथ ,मित्राचा खांद्यावर हात ,सुख दु:खातला शेजार,मामाचे लाड हि संकल्पना दिनदर्शिकेतून अतिशय सुरेखरित्या मांडण्यात आली आहे.
चौकट -रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहकाभिमुख योजना सातत्याने राबविण्यात येणार आहे. सामाजिक जबाबदारीमध्ये पेढी दरवर्षी आपला खारीचा वाटा उचलत असते. त्यातून विद्यार्थिना ११ सायकलीचे वाटप करण्यात आले. पाच विद्यार्थीनी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहेत. रौप्य महोत्सवी वर्ष विसपुते सराफ पेढी ग्राहकांसमवेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करणार आहे. —–यश विसपुते, विसपुते सराफ पेढी, कोपरगाव
Post Views:
170