कोपरगावात आमदार आशुतोष काळे गटाचा वरचष्मा

कोपरगावात आमदार आशुतोष काळे गटाचा वरचष्मा

In Kopargaon, MLA Ashutosh Kale is the leader of the Kale group

२६ पैकी १५ ग्रामपंचायतींवर काळे गटाचा झेंडा, कोल्हे गटाला ९ ग्रामपंचायतींवरच मानावे लागले समाधानKale group’s flag on 15 out of 26 Gram Panchayats, Kolhe group had to settle for 9 Gram Panchayats only.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue20 Dec22 , 20.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव:- आ.आशुतोष काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत देखील कोपरगाव मतदार संघाचा केलेला विकास मतदार संघातील जनतेला भावला आहे. कोपरगाव मतदार संघावर वर्चस्व कुणाचे? याचे गणित मांडणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी १५ ग्रामपंचायतींची सत्ता आ.आशुतोष काळेंना दिली असून व मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी ग्रामपंचायतीची देखील सत्ता मिळाली आहे. अशा एकूण २७ ग्रामपंचायतींपैकी १६ ग्रामपंचायतींची सत्ता काळे गटाला मिळाली असून कोल्हे गटाच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायतींची सत्ता हस्तगत करून काळे गटाने कोल्हे गटाला जोरदार धक्का दिला आहे.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, शहापूर, वडगाव, भोजडे,  धारणगाव, हंडेवाडी, देर्डे कोऱ्हाळे, सोनेवाडी, तळेगाव मळे, शिंगणापूर, चासनळी, रांजणगाव देशमुख, वेस-सोयगाव, मोर्वीस, खिर्डी गणेश, पढेगाव, बहादराबाद, डाऊच बु., डाऊच खुर्द, चांदेकसारे, बक्तरपूर, खोपडी, सडे, करंजी बु., बहादरपूर या एकूण २६ व मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी अशा एकूण २७ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली आहे. यापैकी माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, शहापूर, वडगाव, भोजडे, हंडेवाडी, चासनळी, रांजणगाव देशमुख, मोर्वीस, पढेगाव, डाऊच बु., चांदेकसारे, बक्तरपूर, सडे, बहादरपूर व मतदार संघातील राहाता तालुक्यातील नपावाडी या ग्रामपंचायतीची देखील सत्ता मिळवून एकूण १६ ग्रामपंचायतींची सत्ता काळे गटाने हस्तगत केली आहे. यामध्ये कोल्हे गटाच्या ताब्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या रांजणगाव देशमुख, चासनळी, चांदेकसारे या  ग्रामपंचायतींची देखील सत्ता कोल्हे गटाकडून काळे गटाने हिसकावली आहे. या निकालात अनेक ठिकाणी काळे गटानेच बाजी मारल्याचे एकूण निकालावरून पाहायला मिळाले. त्यामुळे कोपरगाव मतदार संघात आ.आशुतोष काळे यांचे वर्चस्व असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदार संघात कोल्हे गटाला २७ पैकी केवळ ९ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले आहे. अनेक गावात त्यांचा सुपडा साफ झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून अधोरेखित झाले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे व सर्व कार्यकर्त्यांचे माजी आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून पराभूत उमेदवारांनी देखील पराभवाने खचून जाऊ नये मनातील जिद्द कायम ठेवा आपण देखील या विजयाचे भागीदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

आ. आशुतोष काळेंचा विकास जनतेला भावला ———

चौकट:- आ. आशुतोष काळे यांनी मागील तीन वर्षाच्या काळात कोरोना संकट असतांना देखील अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मतदार संघाचा विकास साधतांना हजारो कोटींचा निधी मतदार संघासाठी आणला. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना, अनेक महत्वाचे रस्ते, आरोग्य व गोदावरी कालव्यांची दुरुस्ती आदी प्रमुख प्रश्न सोडविले आहे. त्याचाच परिपाक ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने काळे गटाला भरभरून मतदान देवून तब्बल १६ ग्रामपंचायतीची सत्ता दिली आहे. यामध्ये काळे गटाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती बरोबरच कोल्हे गटाच्या ताब्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीची सत्ता देखील काळे गटाकडे आली आहे. यावरून मतदार संघातील जनतेला आ. आशुतोष काळे यांनी मागील तीन वर्षात केलेला विकास भावला असल्याचे दिसून येत असून यापुढील काळात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत काळे गट आपली विजयी लय कायम ठेवील यात शंका नाही.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page