कोरोनात कोपरगाव ग्रामीण पोलीस योध्दयांचे काम अतुलनीय – केशवराव होन
कोपरगाव:
कोरोनात आपल्या परिवाराची काळजी न करता 24 तास सेवा बजावणा-या पोलीस योध्दयांचे काम अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार साई आधार प्रतिष्ठान चे मार्गदर्शक केशवराव होन यांनी रविवारी 28 जून रोजी ग्रामीण पोलिसांना N95 मास्क व Sanitizer चे वाटप प्रसंगी व्यक्त केले.
कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके पोलीस उपनिरीक्षक इंगळे, हवालदार अर्जुन बाबर ,राजेंद्र म्हस्के,श्री पवार , श्री सांगळे ,प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय होन, प्रशांत होन, मुकुंद होन, धीरज बोरावके, अभिजित झगडे, संजयलाला होन, प्रल्हाद पवार, किरण होन, देवेंद्र शिंदे आदीसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
साई आधार प्रतिष्ठानने यावर्षी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी आ स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत भाजीपाला उपलब्ध करून दिला होता तर गरजू व गरीब कुटुंबांना मोफत किराणा सामानाचे ही वाटप केले होते.शेवटी आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय होन यांनी मानले.