प्रोत्साहन अनुदान : सहा हजार शेतकरी वंचित – दिलीप बोरनारे 

प्रोत्साहन अनुदान : सहा हजार शेतकरी वंचित – दिलीप बोरनारे 

Incentive grant: Six thousand farmers deprived – Dilip Bornare

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat24 Dec22 , 16.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : प्रोत्साहन अनुदानापासून जवळपास ६००० शेतकरी वंचित असून त्यांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी त्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे. आ. आशुतोष काळे पाठपुरावा करीत आहेत अशी माहिती कर्मवीर काळे  साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे .

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयाची अंमबजावणी होवून १ हजार ३२३ शेतकऱ्यांना हे अनुदान यापूर्वीच मिळाले आहे. मात्र अजूनही जवळपास ६००० शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. त्यासाठी आ. आशुतोष काळे पाठपुरावा करीत असून  लवकरच या शेतकऱ्यांना देखील हे अनुदान मिळणार आहे. त्यावेळी  खुशाल बातम्या प्रसिद्ध करून श्रेय घ्यावे, असा टोला दिलीप बोरनारे यांनी लगावला आहे. 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page