वेळापुर चर क्रमांक दोन, पुलाचे काम रखडले,- सरपंच गोरे
ठेकेदाराची टाळाटाळ, जलनिस्सारणचे दुर्लक्ष, ग्रामस्थ परेशान
वृत्तवेध ऑनलाईन । News Portal |Marathi Batmya,
By Rajendra Salkar
Updated: Thuday 23 July 2020, 19.20
कोपरगाव : वेळापुर चर पुलाचे काम बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या रखडले असल्याने दळणवळणाची गैरसोय निर्माण झाली असल्याची तक्रार वेळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने गोदावरी कालवे जलनिस्सारण उपविभाग, कोपरगाव. उपविभागीय अभियंता यांच्याकडे वेळापूर ग्रामपंचायत सरपंच बाबासाहेब गोरे यांनी केली आहे.
मौजे वेळापूर ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे गोदावरी उजवा तट कालव्यावरील वेळापूर चर क्रमांक २ पुलासाठी निधी मंजूर झाला. बांधकाम विभागाने तातडीने ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्षात पुलाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सद्यस्थितीत जुना पूल पाडण्यात आलेला असून हंगामी स्वरूपात १७ जुलै रोजी नळ्या टाकून रस्ता सुरू आहे. परंतु सदर पाईप उघडे ठेवण्यात आल्यामुळे त्यावरून दळणवळण करणे अशक्य झाले, असून दूध उत्पादकांना दूध वाहतूक करणे गैरसोयीचे झाले आहे. काम अपूर्ण असून उर्वरित काम रखडले आहे. अशी माहिती वेळापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वैरागळ यांनी दिली. याबाबत त्यांनी ग्रामपंचायत वेळापूर यांच्याकडे तक्रार केली होती.
सरपंच गोरे म्हणाले, पावसाळा तोंडावर असताना काम सुरू केलेले असून आतापर्यंत हे काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र जलनिस्सारण विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. ग्रामस्थांनी वारंवार बांधकाम विभागात विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दुरुस्तीचे काम अपुर्ण असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जुना पूल पाडल्यामुळे पयार्यी लगतच्या पुलाखाली असणा-या पाइप मोकळ्याच असल्याने धोका निर्माण झाला आहे. दळणवळणाची गैरसोय झाल्याने ग्रामस्थांनी सध्या याच पुलाच्या रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वैरागळ यांनी सातत्याने या कामाचा पाठपुरावा केला आहे.
ठेकेदार राजेंद्र बेलदार चेअरमन वैष्णवी मजूर सहकारी संस्था मर्यादित सोसायटी यांना दिलेले आहे. सदर कामाबाबत ठेकेदाराकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. संबंधित जलनिस्सारण विभागाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन तातडीने पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तहसिलदार यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करावी असे तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. या अर्जावर वेळापूर सरपंच बाबासाहेब गोरे व ग्रामसेवक डि. जे. वारुळे यांच्या सह्या आहेत.